नाशिक : शहराचे प्रथम महापौर कै. शांतारामबापू वावरे यांना जयंतीदिनी राजीव गांधी भवन येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्यालयात असलेल्या शांतारामबापूंच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर अशोक मुर्तडक यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी उपमहापौर गुरुमित बग्गा, सिडको प्रभाग सभापती कांचन पाटील, नामदेव पाटील, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, शहर अभियंता सुनील खुने, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, उपअभियंता धामणे, वावरे परिवारातील शिवनाथ कडभाने, सुलोचना हिरे, छाया कडभाने, विक्रांत वावरे, अंकिता वावरे, मीनाक्षी वावरे, सूरज वावरे, सुनील वावरे, प्राची दाते, रईस खान आदि उपस्थित होते.
शांतारामबापू वावरे यांना जयंतीदिनी अभिवादन
By admin | Updated: August 17, 2015 01:18 IST