शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
4
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
5
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
6
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
7
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
8
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
9
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
10
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
11
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
12
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
13
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
14
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
15
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
16
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
17
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
18
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
19
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
20
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

जयंती उत्सव : ‘बालो जय विश्वकर्मा की...’ नाशिकमध्ये निघालेल्या मिरवणूकीतून समाजप्रबोधनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:23 PM

विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देमिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘सशक्त महिला, सशक्त समाज, सशक्त संघटन’

नाशिक : शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. सोमवारी (दि.२९) सोमवार पेठेमधील श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या वतीने सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये सहभागी चित्ररथ मुख्य आकर्षण ठरले.विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्ष विलास सूर्यवंशी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष बाळकृष्ण दिघे, दशरथ शिरसाठ, निवृत्ती बोराडे, सुनीता जगताप, प्रज्ञा भालेराव यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातपूर, मातोरीसह सिडकोच्या स्वानंद भजनी मंडळाच्या टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिरापासून निघालेली मिरवणूक तिवंधा चौक, मेनरोड, रविवार कारंजा, बोहरपट्टी, सराफ बाजारातून मार्गस्थ होत गोदाकाठावरून नेहरू चौकमार्गे विश्वकर्मा मंदिराजवळ पोहचली. येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत ‘विश्वकर्मांची किमया, मान्यकरी सारी दुनिया’, ‘बोलो जय विश्वकर्मा’, ‘नवीन पर्व, विश्वकर्मा सर्व’, ‘नाही एक जातीधर्माचा, विश्वकर्मा भूतलावरील सर्वांचा’ अशा विविध घोषवाक्यांचे फलक यावेळी समाजबांधवांनी झळकविले. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘सशक्त महिला, सशक्त समाज, सशक्त संघटन’, ‘स्त्री भ्रूणहत्या थांबवा’, ‘पाणी वाचवा, इंधन वाचवा’ असा सामाजिक संदेशही घोषवाक्यांच्या फलकांद्वारे देण्यात आला. दरम्यान, जयंती उत्सव समितीच्या वतीने मंदिरामध्ये मागील चार दिवसांपासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम घेण्यात आले. सोमवारी दिवसभर महाप्रसादाचे वाटप केले जात होते.

टॅग्स :NashikनाशिकHinduहिंदूgodavariगोदावरी