शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीत रंगणार ‘बर्ड फेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:34 IST

नाशिक : येथील वनविभागाच्या (वन्यजीव) वतीने नांदूरमधमेश्वर राष्टÑीय पक्षी अभयारण्यामध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीनदिवसीय ‘बर्ड फेस्टिव्हल- २०१८’ आयोजित केला आहे. या दरम्यान, पक्षीप्रेमींना पक्षी अभ्यासकांमार्फत पक्ष्यांची जैवविविधता जाणून घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देतीनदिवसीय ‘बर्ड फेस्टिव्हल- २०१८’ वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पत्रकार परिषद

नाशिक : येथील वनविभागाच्या (वन्यजीव) वतीने नांदूरमधमेश्वर राष्टÑीय पक्षी अभयारण्यामध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीनदिवसीय ‘बर्ड फेस्टिव्हल- २०१८’ आयोजित केला आहे. या दरम्यान, पक्षीप्रेमींना पक्षी अभ्यासकांमार्फत पक्ष्यांची जैवविविधता जाणून घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्णातील निफाड तालुक्यातील चापडगाव येथे वन्यजीव विभागाच्या वतीने पक्षी निरीक्षण गॅलरी, मनोरे उभारले आहेत. नांदूरमधमेश्वर बंधाºयाच्या पाणथळ जागेच्या परिसरात हे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे या अभयारण्याला नांदूरमधमेश्वर असे नाव पडले. या अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यामध्ये देशी-विदेशी पक्ष्यांचे संमेलन भरलेले पहावयास मिळते. सायबेरीया, युरोप, आफ्रिका अशा विविध देशांमधून स्थलांतरित पक्षी येथे हजेरी लावतात. सध्या हजारो पक्षी येथील पाणथळ जागेवर पाहुणचार घेत भूक भागवित आहेत.२या पक्ष्यांची माहिती व्हावी, त्यांची जैवविविधता, नागरिकांना जाणून घेता यावी, यासाठी वन्यजीव वनविभागाच्या वतीने प्रथमच बर्ड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. बर्ड फेस्टची वेळ पहाटे सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात पक्षी अभ्यासकांसमवेत अभयारण्यात पक्षीनिरीक्षण शिवार फेरी दुपारच्या सत्रात चर्चासत्र व संध्याकाळच्या सत्रात पुन्हा शिवार फेरी असा क्रम राहणार असल्याचे वन्यजीव विभागाने सांगितले. छायाचित्र प्रदर्शनफेस्टिव्हलदरम्यान तीनदिवसीय ‘नांदूरमधमेश्वर छायाचित्र प्रदर्शन’ भरविले जाणार असून, या प्रदर्शनासाठी वन्यजीव विभागाच्या वतीने सर्वच हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांना आवाहन करण्यात आले आहे. चांगल्या दर्जाचे नांदूरमधमेश्वर या अभयारण्याच्या परिसरात टिपलेले विविध पक्ष्यांचे छायाचित्र वन्यजीव वनसंरक्षक कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाठवावे, निवडक छायाचित्रांना प्रदर्शनामध्ये स्थान दिले जाईल तसेच विजेते छायाचित्रही निवडून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे प्रवीण यावेळी म्हणाले. सदर प्रदर्शन चापडगाव परिसरापासून दोन किलोमीटरवर खानगावथडी गावात वन्यजीव विभागाने उभारलेल्या निसर्ग निर्वाचन केंद्रात भरविले जाणार आहे.