नाशिक : भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मुकणे धरणाकरिता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी १९९४ साली शासनाने ताब्यात घेतल्या त्या प्रकल्पग्रस्तांचे २०१५ पर्यंत पैसे मिळालेले नाहीत. त्या संदर्भात जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनावर वरील शेतकऱ्यांसोबत नमिता मोहाडकर, ज्ञानेश्वर उबाळे, नूर सय्यद, कमलेश तिडके, मुकेश सिंग, अंजली वैद्य, सूर्यकांत आहेर, चंद्रकांत बोंबले, भरत आहेर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, सन १९९४ साली महाराष्ट्र शासनाने मुकणे धरण बांधण्याकरिता वरील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. तेव्हा शेतकऱ्याला प्रतिएकर फक्त रुपये ६५०००/- देण्याचे ठरविले आहे. आता मुकणे धरण बांधून झाल्यामुळे त्या भागात प्रतिएकर ४०-५० लाख रुपये असा जमिनीचा भाव झाला आहे. मागील २१ वर्षे सदर शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने जमिनीचा मोबदला न दिल्यामुळे सदर शेतकरी भूमिहीन झाले आहे. तरी शासनाने आजच्या बाजारभावाने जमिनीचे पैसे द्यावेत, त्याचप्रमाणे मागील २१ वर्षांचे चक्रव्याढ व्याज शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
भीमशक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By admin | Updated: November 23, 2015 23:16 IST