शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदारांच्या बिलांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:09 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग व इतर शासकीय विभागांची विकास कामे करून घेतली जातात. संपुर्णत: बांधकाम खात्याच्या नियंत्रणाखाली ठेकेदारांकरवी करून घेतल्या जाणा-या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरू होणा-या प्रत्येक कामाची कामनिहाय नोंद ठेवणारी मोजमाप पुस्तिका ठेवली जाते.

ठळक मुद्देअधिकारी-ठेकेदारांचे संगनमत : मोजमाप पुस्तिकाच गायबकार्यकारी अभियंत्यांनी आता त्या संदर्भात पोलीसात तक्रार दाखल करण्याचा इशाराच दिला आहे.

नाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कामे घेणारे ठेकेदारांचे संगमनत आजवर सर्वश्रृत असून, त्यात आता नवीन प्रकरणाची भर पडली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात आलेल्या शेकडो कामांच्या मोजमाप पुस्तिकाच (एम.बी.) गायब झाल्या असून, परिणामी झालेल्या (?) कामांबाबत शंका निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मोजमाप पुस्तिका ताब्यात ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिका-यांची असतांना अनेक वर्षे उलटूनही त्यांनी मोजमाप पुस्तिका जमा न केल्याने त्यांना स्मरणपत्रे पाठवूनही उपयोग होत नसल्याचे पाहून कार्यकारी अभियंत्यांनी आता त्या संदर्भात पोलीसात तक्रार दाखल करण्याचा इशाराच दिला आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग व इतर शासकीय विभागांची विकास कामे करून घेतली जातात. संपुर्णत: बांधकाम खात्याच्या नियंत्रणाखाली ठेकेदारांकरवी करून घेतल्या जाणा-या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरू होणा-या प्रत्येक कामाची कामनिहाय नोंद ठेवणारी मोजमाप पुस्तिका ठेवली जाते. त्या त्या कामाची जबाबदारी सोपविलेल्या कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंत्यांनी आपल्या अखत्यारितील कामाची प्रगती व त्याचे या पुस्तिकेत वेळोवेळी मोजमाप नोंदविणे अपेक्षित असते. बहुतांशी वेळेस ही पुस्तिका काम करणा-या ठेकेदाराच्या ताब्यात सोयीसाठी ठेवली जाते. काम पुर्ण झाल्यानंतर संबंधित अधिका-याने कार्यारंभ आदेशाप्रमाणे कामकाज झाले किंवा नाही त्याची प्रत्यक्ष स्थळभेट देवून पाहणी करणे व तशी मोजमाप करून पुस्तिकेत नोंद करणे व या पुस्तिकेतच कामाचे बिल तयार केले जाते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाच्या अखत्यारित येणा-या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यात गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या कामाच्या मोजमाप पुस्तिकाच आता सार्वजनिक बांधकाम खात्याला सापडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही कामे झाली किंवा नाही याचा उलगडा करण्याचे कोणताही महत्वाचा पुरावा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सध्या उपलब्ध नसल्याने या कामाचे बिले अदा करण्याचे कामही पुर्णत: ठप्प झाले आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात असलेल्या कागदपत्रांच्या आधारे कार्यकारी अभियंत्यांनी माहिती संकलित केली असता, जवळपास ३३५ कामांच्या मोजमाप पुस्तिका गायब झाल्या असून, संबंधित अधिका-यांना वारंवार विचारणा करूनही त्यांच्याकडून वा काम करणा-या ठेकेदाराकडून कोणतीही दाद दिली जात नसल्याने या कामांच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागNashikनाशिक