शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

वीज जोडणी न देताच बिलाची आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:24 IST

शेतीसाठी वीज जोडणी न करताच तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रंजक महाराज ढोकळे यांना महावितरणने ९७१० रुपयांचे बिल काढले आहे. याबाबत या शेतकऱ्याने आता महावितरणलाच कायदेशीर नोटीस बजावली असून ग्राहक न्यायालयातही दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्देमहावितरणचा भोंगळ कारभारडोंगरगावच्या शेतकऱ्याला आला अनुभव

येवला : शेतीसाठी वीज जोडणी न करताच तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रंजक महाराज ढोकळे यांना महावितरणने ९७१० रुपयांचे बिल काढले आहे. याबाबत या शेतकऱ्याने आता महावितरणलाच कायदेशीर नोटीस बजावली असून ग्राहक न्यायालयातही दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील  डोंगरगाव येथील शेतकरी रंजक महाराज ढोकळे यांनी २०१० साली शेतीसाठी नवीन वीज जोडणीसाठी ४६०० रुपयाचे कोटेशन शुल्क भरुन महावितरणकडे अर्ज केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये म्हणजे तब्बल १० वर्षांनी त्यांच्या माळावरील शेतात महावितरणने नवीन जाेडणीसाठी डी. पी. बसवून दिली. मात्र सदर डी.पी. सोबत असलेला ट्रान्सफॉर्मर हा फॉल्टी असल्याने,  सदर डी.पी. ला वीज सप्लाय दिलाच नाही. सदर ट्रान्सफॉर्मर बदलून मिळावा म्हणून रंजक ढोकळे यांनी येवला येथील महावितरणच्या कार्यालयात अनेक  फेऱ्या मारल्या पण महावितरणने कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, रंजक ढोकळे हे मागील महिन्यात पुन्हा एकदा महावितरणच्या येवला येथील उप विभागीय कार्यालयात गेले असता त्यांच्या हातावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चक्क ९७१० रुपयांचे बिल थोपविले व सदर रक्कम भरल्याशिवाय आपल्याला नवीन ट्रान्सफॉर्मर देणार नाही असे सांगितले. त्यामुळे या शेतकऱ्याने आता महावितरणला तब्बल ५ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. सततच्या वीज भारनियमनाने ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्तn जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सतत होणाऱ्या वीज भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी रात्री वीज देण्यात येते, दुपारी पुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. महावितरणने समान वेळेत वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज