शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

नोटबंदीचा निर्णय सर्वांत मोठी चूक :  यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:32 IST

अटलबिहारी वाजपेयी सरकारने आर्थिक विकासाचे जे मॉडेल समोर ठेवले होते, ते यूपीए आणि एनडीए सरकारने पुढे न नेल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. नोटबंदीचा निर्णय ही सर्वांत मोठी चूक ठरली. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्राला बसला. सद्य:स्थितीत सरकारकडून आर्थिक विकासाच्या वेगाची दिली जाणारी आकडेवारी संशयास्पद असल्याचे प्रतिपादन भारताचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी महावीर व्याख्यानमालेत बोलताना केले.

नाशिक : अटलबिहारी वाजपेयी सरकारने आर्थिक विकासाचे जे मॉडेल समोर ठेवले होते, ते यूपीए आणि एनडीए सरकारने पुढे न नेल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. नोटबंदीचा निर्णय ही सर्वांत मोठी चूक ठरली. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्राला बसला. सद्य:स्थितीत सरकारकडून आर्थिक विकासाच्या वेगाची दिली जाणारी आकडेवारी संशयास्पद असल्याचे प्रतिपादन भारताचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी महावीर व्याख्यानमालेत बोलताना केले. नाशिक जिल्हा सांस्कृतिक कला फाउंडेशन आणि जैन सेवा कार्यसमिती यांच्या वतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प यशवंत सिन्हा यांनी ‘भारताची आर्थिक वाटचाल व दिशा’ या विषयावर गुंफले. अध्यक्षस्थानी वनाधिपती विनायकदादा पाटील होते. यावेळी सिन्हा यांनी स्वातंत्र्यापासून ते ९०च्या दशकापर्यंत बदलत्या अर्थव्यवस्थेचा वेध घेत पुढे सांगितले, वाजपेयी सरकारने आर्थिक विकासाचे एक मॉडेल समोर ठेवले होते. त्यात सरकारी गुंतवणूक वाढविणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे यांचा समावेश होता. त्यातून राष्टÑीय महामार्गाची निर्मिती झाली. ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विस्तारले.  टेलिकॉम क्षेत्रात सुधारणा झाली. परंतु, नंतर यूपीए सरकारने एक्साइज ड्यूटीमध्ये सवलत दिली. मनरेगा सुरू केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मागणी आणि पुरवठा यांच्यात जेव्हा संतुलन राहत नाही, तेव्हा अर्थव्यवस्था विकृत होत जाते. भारताची अर्थव्यवस्था ही जटिल आहे. प्रत्येक घटकाचा विचार करावा लागणार आहे. २०१४ मध्ये जेव्हा एनडीए सरकार आले तेव्हा सुमारे २५ ते ३० लाख कोटी रुपयांचे प्रकल्प रखडलेले होते. बॅँकांचे एनपीए वाढलेले होते. आंतरराष्टÑीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पडलेल्या होत्या. परंतु, आता चार वर्षांत मागे वळून पाहिले तर चुकीच्या धोरणांचा अवलंब करण्यात आला. बॅँकांचा एनपीए वाढलेला आहे. सहा लाख कोटीने बचत कमी झाली आहे. गेल्या १४ वर्षांत एकही मोठा प्रकल्प उदयास आला नाही. शेतकरीवर्ग दु:खी आहे. महाराष्टÑात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या वाढते आहे. सर्वत्र नैराश्याची स्थिती आहे. भुलभुलय्या सुरू आहे. आश्वासने मात्र मोठी देताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंतही सिन्हा यांनी व्यक्त केली. सरकार स्थापन झाले त्यावेळी ‘टीम इंडिया’ची चर्चा केली गेली. परंतु, आज कुठे आहे ‘टीम इंडिया’ असे सांगत त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. प्रास्ताविक गौतम सुराणा यांनी केले. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा, डॉ. भाऊसाहेब मोरे, सोहनलाल भंडारी, प्रवीण खाबिया आदी उपस्थित होते.फडणवीसांवरही निशाणायशवंत सिन्हा यांनी महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. सिन्हा म्हणाले, मागील वर्षी अकोला येथे शेतकºयांचे आंदोलन झाले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. मुंबईत काही दिवसांपूर्वी किसान सभेचा मोर्चा आला. त्यांच्याही सर्व मागण्या मान्य केल्या. दिल्लीत अण्णा हजारे यांनी उपोषण केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मागण्या सर्व मान्य करतात; परंतु अंमलबजावणी एकाचीही झालेली नाही. अकोला येथे झालेल्या आंदोलनासंदर्भात लिखित आश्वासन देऊनही अद्याप एकही मागणी अंमलात आली नसल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हा