शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

अवयवदान जनजागृतीसाठी सायकल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:03 IST

अवयवदान जनजागृतीचा संदेश देण्यासाठी राजेंद्र सोनवणे-नाशिक, किसन ताकमोडे- अहमदनगर, गणेश नरसाळे- सोलापूर, सूरज कदम-सातारा या चार जिल्ह्यातील चार समविचारी मित्रांनी पुणे ते आनंदवन ही सुमारे एक हजार किलोमीटरची सायकल यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

नाशिक : अवयवदान जनजागृतीचा संदेश देण्यासाठी राजेंद्र सोनवणे-नाशिक, किसन ताकमोडे- अहमदनगर, गणेश नरसाळे- सोलापूर, सूरज कदम-सातारा या चार जिल्ह्यातील चार समविचारी मित्रांनी पुणे ते आनंदवन ही सुमारे एक हजार किलोमीटरची सायकल यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली.  ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत या यात्रेचे आयोजन करण्यात आले. मृत्यूनंतरही अवयवदानाद्वारे इतरांना जीवनदान देता येते, हा संदेश या यात्रेच्या माध्यमातून या चार सायकलपटूंनी ठिकठिकाणी दिला. गत चार वर्षांपासून या यात्रेचे आयोजन या युवकांकडून केले जाते. दरवर्षी नवा सामाजिक संदेश सायकलयात्रेतून देण्याचा या चार मित्रांचा प्रयत्न असतो. पुण्यातील शनिवारवाडा येथून यात्रेस प्रारंभ करण्यात आला.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, हिवरे बाजारचे पोपटराव पवार, पाटोदा आदर्श गावचे भास्करराव पेरे, आनंदवनचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, डॉ. भारतीताई आमटे, कौस्तुभ आमटे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनीताई आमटे, अनिकेत आमटे या मान्यवरांनी या सायकल यात्रेचे स्वागत केले.आमटे यांच्या प्रकल्पाने विद्यार्थी भारावलेयात्रेदरम्यान राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पाटोदा या आदर्श गावांसहित अहमदनगर येथील स्नेहालय, पवनार येथील आचार्य विनोबा भावे आश्रम, वर्धा येथील सेवाग्राम आश्रम, डॉ. प्रकाश आमटे यांचा गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा प्रकल्प या विविध सामाजिक संस्थांना भेटी दिल्या. तसेच बुलढाणा, औरंगाबाद, वाशीम, जालना, यवतमाळ, लाड कारंजा, कळंब, वर्धा येथेही भेटी देऊन शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्थांमध्ये अवयवदान जनजागृतीचा जागर करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवन या महारोगी सेवा समितीच्या, कुष्ठरोगी बांधवांच्या पुनर्वसनासाठी बाबा आमटे यांनी साकारलेल्या प्रकल्पावर यात्रेचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :CyclingसायकलिंगNashikनाशिक