पर्यावरणाच्या रक्षणासाठी 'माझी वसुंधरा' हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना मार्गदर्शन करुन विविध उपक्रम हे प्रशासनाद्वारे घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सायकल रॅलीचे आयोजन केले होते. नियमित सायकल चालविल्याने शरीराचा व्यायाम होत असतो , इंधनाची बचत व वायू प्रदुषण कमी होते. त्यामुळे शहरातील महर्षी वाल्मीकी क्रीडा संकुलापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅलीचे आयोजन केले होते. सायकल रॅलीचा शुभारंभ मनमाड नगरपरिषदेचे गटनेते गणेश धात्रक यांनी शिट्टी वाजवून केली. याप्रसंगी उपस्थित नागरिकांना प्रशासनाद्वारे पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.रॅलीत मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे, नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी , पेडल फॉर हेल्थ सायकल ग्रुप, रोटरी क्लब मनमाड सिटी , लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी , पर्यावरण आणि सायकल प्रेमी नागरिक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.
मनमाड नगरपरिषदेतर्फे सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:51 IST