खर्डे : येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात क्रीडा व खेळ मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र, नाशिक व राजमाता जिजाऊ संस्था, कनकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.मुख्याध्यापक अंबादास देवरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला शुभारंभ करण्यात आला. रॅलीत विद्यार्थ्यांसह शिक्षक, गावातील युवक सहभागी झाले होते. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रीय युवा स्वयंसेवकचे जगदीश शिंदे, यशवंत देवरे यांनी फीट इंडियासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व उपस्थिताना पटवून दिले.
खर्डे येथे सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:16 IST