शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रवळजी परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 16:11 IST

कळवण : तालुक्यातील मौजे रवळजी गावाच्या शिवारातील दरी भागात बिबट्याने दोन बकºया व एक बोकडाचा फडशा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कळवण : तालुक्यातील मौजे रवळजी गावाच्या शिवारातील दरी भागात बिबट्याने दोन बकºया व एक बोकडाचा फडशा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात दिवसा व रात्री शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशी अवस्था झाली आहे. वनविभागाने दरी परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. कळवण तालुका हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवरील तालुका असून गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यात मोठी जंगल संपत्ती शासनाचा प्रयत्नाने राखली गेली आहे. या जंगलात सर्वच प्रकारचे प्राणी आढळून येतात. यात बिबट्यांची मोठी संख्या आहे. हे बिबटे सापुतारा , मंगलीदर, दोन मानूर या परिसरातून कळवण तालुक्यात येत असतात. त्यामुळे पुनंद खोर्यातील सर्वच भागात बिबट्यांची दहशत आहे. तालुक्यातील रवळजी गावाच्या दरी शिवारात कळवण वनविभाग व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने मोठे जंगल राखले गेले आहे. यामुळे येथे बिबट्यांचा नेहमीच वावर आढळला आहे. दि.२२ सप्टेंबरच्या मध्यरात्री शेतकरी दादाजी रामभाऊ पवार यांच्या गोठ्यातील दोन बकºया आणि एक बोकडाचा फडश्या पडला आहे. यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेत वस्तीत राहणाºया नागरिकांना दिवसही घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. वनविभागाने दरी परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.---------------------------------सध्या शेतीचा हंगाम सुरु असून मका, बाजरी, ऊस पिकेही वाढली आहेत. पिकांना खाद्य लावणे, पाणी देणे तर काही पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतात जावेच लागते. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाणे कठीण झाले आहे. बिबट्याचा वावर असल्याची चर्चा झाल्याने शेतमजूरही कामावर येत नाही. मुलांना शाळेत पाठवणेही बंद केले आहे. त्यामुळे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा-भास्कर भालेराव, रवळजी

टॅग्स :Nashikनाशिक