शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 16:29 IST

वावीहर्ष शिवारात बकरीवर हल्ला

ठळक मुद्देतालुक्यात एकापेक्षा जास्त बिबटे असावेत तसेच रानडुक्कर, तरस, कोल्हे आदी वन्यप्राणीही असल्याचे वन विभागाने मान्य केले आहे.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असून परिसरातील चाकोरे, तळवाडे, पहिणे, अंबई, देवगाव टाके, देवगाव, धाराची वाडी, कळमुस्ते, जांभुळवाडी, निरगुडे, वावीहर्ष तसेच तळवाडे शिवारात ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, बिबट्याने वावीहर्ष येथील शेतकऱ्याच्या घरात घुसून बकरीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.तालुक्यात बिबट्यांचा संचार वाढल्याने घबराट निर्माण झाली आहे. बिबट्याने जनावरे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या यांच्यावर हल्ला करत फडशा पाडला आहे. याशिवाय, तीन महिन्यापूर्वी चाकोरे येथील खाडे नावाच्या शेतकºयावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले होते. वावीहर्ष येथील बाबुराव बांगारे यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या शेतातील घरात घुसून बिबट्याने बकरीवर हल्ला केला. बकरीच्या मानेला पकडून घराचा कारवीचा कुड फाडून नेत असताना घरातील माणसांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला. बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने पिंजरा लावावा, यासाठी त्र्यंबकेश्वर वनविभागाला अनेकदा कळविण्यात आले. परंतु, वनविभागाकडून अद्याप त्यावर काहीही उपाययोजना झालेली नाही. तालुक्यात एकापेक्षा जास्त बिबटे असावेत तसेच रानडुक्कर, तरस, कोल्हे आदी वन्यप्राणीही असल्याचे वन विभागाने मान्य केले आहे. गाव-शहरात वन्यप्राण्यांचा वाढता वावर दहशत निर्माण करत असून वनविभागाने त्याबाबतीत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक