शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

ऊसशेतीत आढळला बिबट मादी बछडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:44 IST

या भागातील मळे परिसरात बिबट मादीचा संचार असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. यामुळे शेतमजुरांना व मालकांना सावधगिरी बाळगत सुर्यास्तापुर्वी शेतीतून घरी सुरक्षित जाण्याच्या सुचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देबछडा अगदी सुस्थितीत पुर्णपणे सुदृढ

नाशिक : येथील पाथर्डी गावापासून पुढे दीड किलोमीटर अंतरावर गौळाणे रस्त्याला लागून असलेल्या यशवंतनगरमधील कोंबडे मळ्यातील एका ऊसाच्या शेतात तोडणीदरम्यान बिबट्याचा एक बछडा कामगारांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक वन्यजीवप्रेमींसह मळ्यात दाखल झाले.

गौळाणे रस्त्यालगत यशवंतनगर चा मळे परिसर आहे. येथील कोंबडे मळ्यात एका नैसर्गिक नाल्याच्या वरील बाजूस असलेल्या ऊसशेतीमध्ये ऊसतोडणी नेहमीप्रमाणे सुरू होती. दरम्यान, अखेरच्या टप्प्यात कामगार ऊस कापत असताना वावरात त्यांना बछडा नजरेस पडला. याबाबतची माहिती त्यांनी शेतीमालक संजय शिवाजी कोंबडे यांना दिली. त्यांनी तत्काळ नाशिक पश्चिम वनविभागाच्या कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संपर्क साधून याबाबत कळविले.

माहिती मिळताच वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे, रोहिणी पाटील, विजय पाटील, इको-एको फाउण्डेशन या वन्यजीवप्रेमी संस्थेचे वैभव भोगले, प्रथमेश पाटील यांनी घटनास्थळ गाठले. बछडा अगदी सुस्थितीत पुर्णपणे सुदृढ असल्याचे लक्षात येताच त्याला अगदी काळजीने वन्यजीवप्रेमींनी हाताला कडुनिंबाचा पाळा चोळून घेत मेडिकल हातमोजे चढवून हाताळत बास्केटमध्ये कडुनिंबाच्या पाला टाकून त्यामध्ये ठेवले.या भागातील मळे परिसरात बिबट मादीचा संचार असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. यामुळे शेतमजुरांना व मालकांना सावधगिरी बाळगत सुर्यास्तापुर्वी शेतीतून घरी सुरक्षित जाण्याच्या सुचना दिल्या आहेत.
‘खबरदारी घ्या, सतर्कता बाळगा...’
आज ढगाळ हवामान असल्यामुळे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास यशवंतनगरमधील तसेच आजुबाजुच्या परिसरातील सर्व मळ्यांमधील शेतमजुर वर्गाने बांध सोडावा तसेच मळ्यालगत वस्तीवर राहणाऱ्या रहिवाशांनी आपआपल्या लहान मुलांना घरात सुरक्षित ठेवावे, संध्याकाळी कोणीही बाहेर पडू नये, पशुधनदेखील सुरक्षित ठिंकाणी बंदिस्त करावे, बिबट मादी नजरेस पडल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, अशा विविध सुचना गस्तीपथकाकडून वाहन फिरवून ध्वनिक्षेपकामार्फत परिसरात देण्यात आल्या.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागFarmerशेतकरीagricultureशेतीwildlifeवन्यजीव