लोहोणेर : भऊर - विठेवाडीदरम्यान असलेला शिवरस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत असून, सदर रस्त्याची त्वरित दुरु स्ती करण्यात यावी अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे . मुसळधार पावसामुळे सदरचा फरशीपूल व मातीचा भर वाहून गेल्याने शिवरस्ता पूर्णत: बंद झाल्यामुळे वाहतुकीसाठी अनंत अडचणी निर्माण झाल्या असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित फरशीपुलाची दुरु स्ती करून शिवरस्ता सुरळीत करावा तसेच सदर शिवरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून देण्यात यावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता लोहोणेर - कळवण रस्ता बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर कुबेर जाधव, नानाजी पवार, दिनकर जाधव, अभिजित पवार, अमर जाधव, फुला जाधव आदिंसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
भऊर, विठेवाडी रस्ता गेला वाहून
By admin | Updated: July 22, 2016 22:51 IST