शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला प्रसाद योजना विकास कामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 16:30 IST

रावल यांची उपस्थिती : सुमारे ३८ कोटी रुपयांची योजना

ठळक मुद्देरोजगाराची निर्मीती करण्यासाठी राज्यातील ४५० किल्ल्यांचे संवर्धन, सौदर्यीकरण हाती घेण्यात येत आहे

त्र्यंबकेश्वर : येथे ३७.८१ कोटी रु पयांच्या प्रसाद योजनेतील १७ विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे पर्यटन तथा रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येत्या वर्षभरात त्र्यंबकेश्वरचा कायापालट केला जाणार असल्याचे आश्वासन रावल यांनी बोलताना दिले.अहल्या गोदावरी संगमघाटावर असलेल्या नरायण नागबली धर्मशाळेच्या भूमिपूजनाने योजनेच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, पर्यटन सचिव विनिता सिंगल,भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आमदार योगेश घोलप, भाजपाचे नेते लक्ष्मण सावजी, नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक अभियंता विनय वावधने, दत्ता गायकवाड आदिंसह मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर छत्रपती शवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत बोलताना रावल यांनी सांगितले, राम मंदिरासाठी आम्ही कटीबध्द आहोत, त्याच सोबत प्रभुरामचंद्राचा पदस्पर्श झालेल्या स्थळांचा विकास करण्यासाठी रामायण सर्कीटच्या माध्यमातून कोटयवधी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात येत आहे. रोजगाराची निर्मीती करण्यासाठी राज्यातील ४५० किल्ल्यांचे संवर्धन, सौदर्यीकरण हाती घेण्यात येत आहे. रायगडावरु न येत्या ११ तारखेस याची घोषणा करण्यात येणार असून किल्ल्यांच्या सौंदर्यीकरणातून स्थानिकांना रोजगार हमी अंतर्गत कामे उपलब्ध होणार असल्याचेही रावल यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ निवृत्ती जाधव, दिनकर आढाव, मनोहर मेढे पाटील, समाधान बोडके शिवसेना तालुका प्रमुख समाधान बोडके, भाजपाचे विनायक माळेकर, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, स्वप्नील शेलार, सागर उजे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शामराव गंगापुत्र, बांधकाम सभापती सायली शिखरे, आरोग्य सभापती माधवी भुजंग,शिवसेना गटनेत्या मंगल आराधी, नगरसेविका कल्पना लहांगे, त्रिवेणी तुंगार, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक