शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

भुजबळ उतरले आखाड्यात

By admin | Updated: August 9, 2015 23:30 IST

सिंंहस्थ कुंभमेळा : नाशिक, त्र्यंबक, कावनाईला भेट

भुजबळ उतरले आखाड्यातसिंंहस्थ कुंभमेळा : नाशिक, त्र्यंबक, कावनाईला भेटनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंतांकडून प्रशासनावर होणारे आरोप, आखाड्यातील आपसातील मतभेद आणि पोलीस प्रशासनाकडून नाशिककरांची होणारी अडवणूक या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री छगन भुजबळ आता आखाड्यात उतरले आहेत. भुजबळ यांनी कावनाई, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील आखाड्यांना भेटी देऊन येणारे भाविक आणि साधूंना चांगल्या सुविधा देणे हे यजमान म्हणून आपली जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. भुजबळ यांनी त्र्यंबक येथील बडा उदासीन आखाडाचे प्रमुख रघुमुनीजी महाराज, निरंजनी आखाड्याचे प्रमुख नरेंद्रगिरी महाराज, अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे महंत सागरानंद महाराज, महंत हरिगीरीजी महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांच्या भेटी घेतल्या.याप्रसंगी भुजबळ यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आपण सक्रिय झाल्याचे संकेत देत संपूर्ण साधुग्रामची पाहणी केली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. या सर्व भाविकांना पर्यटकांना मोठ्या प्रमाणवर सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. येणाऱ्या भाविक व पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार असून, आर्थिक उलाढालही होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी -सुविधा देणे आपले काम आहे. सर्व पक्ष व विविध गट, स्वयंसेवक यांनी एकत्र येऊन हा पवित्र सोहळा पार पाडावा, असे आवाहनदेखील भुजबळ यांनी केले. यावेळी बडा उदासीन आखाड्याचे प्रमुख महंत रघुमुनी महाराज यांनी सांगितले की, आम्ही छगन भुजबळ यांचे पाहुणे आहोत. त्यामुळे हा कुंभमेळा चांगल्याप्रकारे होईल यात शंका नाही. मात्र, प्रशासनाकडून पाहिजे त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रशासन कमी पडत आहे. हरिगीरीजी महराज यांनीही सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रशासनाकडून सुविधांचा अभाव असल्याचे सांगितले. यावेळी छगन भुजबळ यांनी त्र्यंबक नगरपरिषदेला भेट दिली. नगराध्यक्ष अनघा फडके, योगेश तुंगार, माधुरी जोशी आदि नगरसेवकांनी त्यांचे सत्कार करून स्वागत केले. यावेळी भुजबळ यांनी कुंभमेळ्यात भाविकांना चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा देण्याचे आवाहन केले.भुजबळ यांनी कामांची केलेली पाहणी, यजमान म्हणून भाविक आणि साधूंसाठी करावयाच्या सुविधा याविषयी विधान केल्यामुळे साधुग्रामच्या समस्या सुटू शकतील, असा विश्वास अनेक साधू-महंतांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, दिलीप खैरे, परवेज कोकणी, अ‍ॅड. संदीप गुळवे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, गोरख बोडके, सुनील वाजे, उदय जाधव, बाळासाहेब गाढवे, कैलास घुले, बिहरू मुळाने, पुरुषोत्तम कडलक आदि मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)