शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

भुजबळांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक

By admin | Updated: September 15, 2015 22:42 IST

राष्ट्रवादीचा चक्काजाम : जिल्ह्यात १९ ठिकाणी आंदोलने

नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थतीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात १९ ठिकाणी रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. नाशिक शहरात मुंबई महामार्गावर द्वारका व जत्रा हॉटेल येथे रास्ता रोको करण्यात आल्याने शहरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ, आमदार हेमंत टकले, आमदार जयंत जाधव, माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली द्वारका चौफुलीवर शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा, तर जत्रा हॉटेल चौफुलीवर माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली सटाणा शहरात रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले की, राज्यात मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. पाणीटंचाई जाणवत असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, सक्तीची वीज वसुली थांबवावी, विद्यार्थ्यांची फी माफ करावी आदि मागण्या सरकारने तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. आमदार भुजबळ यांच्या उपस्थितीत तासभर रास्ता रोको करण्यात येऊन नंतर जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हेमंत टकले, आमदार जयंत जाधव, मनपा विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे, नगरसेवक विनायक खैरे, विक्रांत मते, मनोहर बोराडे, रंजन ठाकरे अर्जुन टिळे, वैभव खैरे, संतोष सोनपसारे, सचिन महाजन, राजेंद्र महाले, छबू नागरे, संजय खैरनार, राजू शेख, शोभा मगर, प्रेरणा बलकवडे, जि. प. सदस्य जयश्री पवार, सुनीता निमसे, प्रेरणा बलकवडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)