शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर धरणातून कालव्याद्वारे पूर पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 17:48 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून पूर पाण्याचे आवर्तन शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कालव्याद्वारे सोडण्यात आले. पूर पाण्यामूळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी पूर पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला सूचन्या केल्या होत्या.

ठळक मुद्देभोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आसून म्हाळूंगी नदी प्रवाहित झाली आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून पूर पाण्याचे आवर्तन शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कालव्याद्वारे सोडण्यात आले. पूर पाण्यामूळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी पूर पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला सूचन्या केल्या होत्या.पश्चिम पट्टयात गेल्या आठवडाभर पाऊस पडल्याने म्हांळुगी नदीला पूर आला होता. म्हाळुंगी नदी प्रवाहित झाल्याने भोजापूर धरणात १६ आॅगस्ट पासून पाणी येण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे ३६० क्षमतेचे भोजापूर धरण गुरूवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरले होते. यावर्षी उशिरा धरण भरल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पूर पाणी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ५ गावे नळपाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर परिसाराचे शेती व्यवसाय अवलंबून आहे. धरण भरल्यामुळे शेतकरी वर्गात आंनद व्यक्त केला जात आहे.या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून तालुक्याचा पूर्व भाग नेहमीच दुष्काळी परिस्थिती असतो त्यामूळे भोजापूर धरणाचे पूर पाणी या भागात गेल्यास सदर गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आसून म्हाळूंगी नदी प्रवाहित झाली आहे. भोजापूर धरणाच्या कालव्याद्वारे नांदूरशिंगोटे व दोडी परिसर या गावाच्या तलावांमध्ये पूरपाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी होती. कालव्यास पूरपाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे आमदार राजाभाऊ वाजे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. आमदार वाजे यांच्या मागणीचा विचार होऊन पाटबंधारे विभागाकडून पूरपाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी (दि.२५) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास भोजापूर धरणावरील गेट फिरवून पाणी कालव्याला सोडण्यात आले. याप्रंसगी जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, बाजार समितीचे संचालक अनिल सांगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के, शाखा अभियंता बी. डब्ल्यु. बोडके, बी.के.आचट, नागेश शेळके ,रामदास सानप, प्रदीप मुंगसे, अरुण शेळके, किरण शेळके,किरण आव्हाड, योगेश शेळके, महादू शेळके, आदि यावेळी उपस्थित होते. नांदूर व दोडी या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. १०० ने क्युसेस कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.