शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

पैशांच्या पावसाचे आमीष दाखवून बलात्कार करणाऱ्या भोंदूला भिवंडीमध्ये ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:16 IST

पोलिसांनी सुरुवातीला भोंदूबाबाचे साथीदार राजेंद्र दामोदर गायकवाड (५३, रा. आंबे जानोरी), अशोक ऊर्फनाना पिराजी पवार (रा. ओझर) यांना अटक केली. त्यानंतर तपासाला गती देत भिवंडीमध्ये भोंदूबाबा असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.

ठळक मुद्देसंशयितांविरोधात बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा

नाशिक : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी संशयित भोंदू विनोदबाबा ऊर्फ तुकाराम राधाकृष्ण हिरे (४७, रा. ओझर) याच्या पोलिसांनी भिवंडी येथून मुसक्या आवळल्या. त्यास बुधवारी (दि.१४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात भोंदूबाबासह त्याचे दोन साथीदारही पोलिसांच्या हाती लागले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ध्रुवनगर येथील एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये विनोद हा पीडित महिलेला घेऊन राहात होता. या महिलेला झटपट श्रीमंती मिळवून देण्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष संशयित विनोदसह त्याच्या काही साथीदारांनी दाखविल्याची फिर्याद पीडितेने दिली आहे. विनोदबाबा याने बनावट पद्धतीने लग्न केल्याचे एक पूजा करून भासविले आणि पीडितेसोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवून बलात्कार केल्याचाही आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला भोंदूबाबाचे साथीदार राजेंद्र दामोदर गायकवाड (५३, रा. आंबे जानोरी), अशोक ऊर्फनाना पिराजी पवार (रा. ओझर) यांना अटक केली. त्यानंतर तपासाला गती देत भिवंडीमध्ये भोंदूबाबा असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पथकाने थेट भिवंडी गाठून त्यास बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यातील विनोद भोंदूबाबाची महिला साथीदार अद्याप फरार आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक