नाशिक : गेल्या वर्षीच्या चांगले खून प्रकरणानंतर शहरात टोळीयुद्धाचा भडका उडाला असून, यातूनच मल्हारखाण येथील तडीपार व सराईत गुन्हेगार भीम पगारेची शुक्रवारी रात्री एका टोळक्याने भगवती चौकात गोळ्या झाडून, तसेच शस्त्राचे वार करून निर्घृण हत्त्या केली़ या प्रकरणी सात संशयितांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यापैकी दोन संशायितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित पाच फ रार झाल्याचे वृत्त आहे़ या घटनेनंतर संतापलेल्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी गोंधळ घातला, तर काहींनी दुकानदारांना धमकावत दुकाने बंद करण्यास भाग पाडले़याबाबत मोनिका किरण काळे (शीतल गार्डन रो-हाऊस, वरदविनायकनगर, अशोका मार्ग) यांनी दिलेल्या फि र्यादीनुसार मल्हारखाण झोपडपीत राहणारा भीम पगारे हा शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीने राजीवनगरकडे जात होता़ त्यास संशयित किशोर बरू, योगेश शेवरे, भावड्या शेवरे, मंगेश शेवरे, रामदास चांगले, शरद चांगले, गणेश चांगले यांनी अडवले़ तो न थांबल्याने त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या़ त्यापैकी एक गोळी त्याच्या मांडीला लागली. जखमी अवस्थेतही तो जीव वाचविण्यासाठी जय गणराज सोसायटीकडे पळाला़ या ठिकाणी संशयितांनी पगारेच्या छाती, पोटावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याचे फि र्यादीत म्हटले आहे़टोळक्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पगारेला रुग्णवाहिकेमधून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले़ हेे वृत्त कळताच मल्हारखाण परिसरातील शेकडो लोकांचा जमाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला़ या ठिकाणी नातेवाइकांनी गोंधळ, घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता़ यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली होती़ संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली होती़ शनिवारी दुपारी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून भाऊ अर्जुन पगारे यास आणल्यानंतर दुपारी मयत पगारेवर अंत्यसंस्कार करण्यात आले़ दरम्यान, सकाळच्या सुमारास गुंडांनी शहरातील दुकाने बळजबरीने बंद करण्यास भाग पाडली़ मल्हारखाण परिसरातही पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता़ पगारेच्या खुनानंतर शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दुपारपर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते़ या खुनातील संशयितांच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली़ दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार संरगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त डॉ़डी़एस़स्वामी, संदीप दिवाण,अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, हेमराजसिंह राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, शंकर काळे आदिंसह पोलीस कर्मचारी प्रयत्नशील होते़ (प्रतिनिधी)फ ोटो :- १० पीएचएमए ८५मयत भीम पगारे
भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या टोळी युध्दातून चांगले खून प्रकरणाचे पडसाद: सात जणांविरूध्द गुन्हा दाखल
By admin | Updated: May 10, 2014 23:47 IST