शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भिल्ल समाज संघटनेचा मोर्चा

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

भिल्ल समाज संघटनेचा मोर्चा

 

नाशिक : धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण दिल्यास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा शनिवारी (दि.९) भिल्ल समाज संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे आघाडी सरकारला देण्यात आला. यावेळी मोर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छोटेखानी सभेत होऊन संघटनेच्या नेत्यांची भाषणे झाली.दुपारी २ वाजेपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून भिल्ल समाज संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या दणका मोर्चास सुरुवात झाली. त्र्यंबक नाका, सीबीएसमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. यावेळी भिल्ल समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन आघाडी सरकारने त्यांचे लाड पुरवू नये. नाहीतर आदिवासी समाज आघाडी सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीतून सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाज हा प्राचीन काळापासून राजसत्तेत जगत आला आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही. आजही धनगर समाजातील व्यक्तींकडे कमीत कमी तीन ते चार लाखांची संपदा असते. ते सधन समाजातील आहेत. इतकेच नव्हे तर ज्यांनी घटना लिहिली आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांवरही धनगर समाजाने आरोप केले आहेत. त्यामुळे आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देता कामा नये. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य साईनाथ मोरे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पवनराजे सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांचीही भाषणे झाली. या मोर्चात संघटनेचे महासचिव किरण ठाकरे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन मोरे, अंकुश सोनवणे, बाळासाहेब बर्डे, रतन सोनवणे, अजित पवार, प्रदीप अहेर, विष्णू सोनवणे, संजय नवरे, नामदेव नवरे, बापू पवार, किरण मोरे, दत्तू पिंपळे, विजय तलवारे, श्रीराम माळी, संतोष निकम, मोतीराम सोनवणे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)