शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात राष्ट्रवादीचे खड्डे दुरूस्तीसाठी ‘भिक मांगो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 15:15 IST

बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना बसस्थानकात उभे राहणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रवाशांची होत असलेली गैरसोय बघता

ठळक मुद्देआंदोलन : निमाणी बसस्थानकाची दुरवस्था प्रशासनाचा निषेध नोंदवून जमा झालेली रक्कम आगारप्रमुखाना दिली.

नाशिक: शहरातील महत्वाच्या निमाणी बसस्थानकाला अनेक समस्यांनी ग्रासले असून येथील दुरावस्थेबाबत आगारप्रमुखाना वारंवार तक्रारी व निवेदन देऊन देखील दुरुस्ती होत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी निमाणी बसस्थानकात उपस्थित प्रवाश्यांकडे ‘भिक मांगो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवाशांनी बस प्रशासनाला भिक देत आंदोलनास पाठींबा दर्शविला.माजी खासदार समीर भुजबळ यांच्या निधीतून पंचवटी निमाणी येथील बसस्थानकाचे अत्याधुनिक पद्धतीने पाच वर्षापुर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. त्यातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आता बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना बसस्थानकात उभे राहणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रवाशांची होत असलेली गैरसोय बघता आगरप्रमुखांना वेळोवेळी समस्यांबाबत निवेदन देण्यात आले होते. वारंवार तक्रारी करून देखील एस. टी. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी सकाळी बसस्थानकात भिक मांगो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदवून जमा झालेली रक्कम आगारप्रमुखाना दिली. प्रशासनाने दखल घेऊन निमाणी बस स्थानकाची लवकर दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कार्याध्यक्ष अ‍ॅड. चिन्मय गाढे, प्रफुल पाटील, किरण पानकर, नवराज रामराजे, किरण मानके, डॉ.संदीप चव्हाण, सुनील घुगे, स्वप्नील चव्हाण, भूषण गायकवाड, विशाल डोखे, नदीम शेख, रितेश जाधव, रोहित जाधव, राज रंधवा, राम शिंदे आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक