नाशिक : अविनाश जनार्दन भिडे यांची बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवा या वकील परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी अहमदनगरचे अॅड. अशोक पाटील यांची निवड झाली.भिडे यांनी आर. वाय. के. सायन्स कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजीमध्ये बी. एस्सी. केले. त्यानंतर एन. बी. टी. लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी संपादन केली. त्यांनी १९८६ पासून नाशिक येथे वकिलीला त्यांनी सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी एक ते दोन वर्षे दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाची वकिली केली. त्यानंतर गेली २६ ते २७ वर्षे ते फौजदारी खटले चालवीत आहेत. लाचलुचपत, खुनाचे खटले, तसेच फौजदारी खटले चालविण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. सन २०१० मध्ये वकील परिषदेवर निवड झाल्यानंतर गत चार वर्षांमध्ये वकील परिषदेच्या सर्व सदस्यांचे सहकार्य घेऊन महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांत वकिली करणाऱ्या सुमारे दीड लाख वकिलांसाठी वकील परिषदेने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. (प्रतिनिधी)
बार कॉन्सिलच्या अध्यक्षपदी भिडे
By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST