शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिडे, एकबोटे यांच्या ‘वॉन्टेड’ पोस्टरने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:36 IST

नाशिक : कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणी अनेक संघटनांनी शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान फाउण्डेशनचे अध्यक्ष संभाजी भिडे व समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे या दोघांविरुद्ध राज्यातील काही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्याचा फायदा उठवून अज्ञात व्यक्तीने एकबोटे व भिडे यांना ‘वॉन्टेड’ ठरवून त्यांचे छायाचित्रे असलेले पोस्टर्स नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लावल्याने खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या नावे लावण्यात आलेल्या या पोस्टर्स प्रकरणी पुणे पोलिसांनी कानावर हात ठेवले असले तरी, स्थानिक पोलिसांना मात्र या पोस्टर्सची खबरबातदेखील नसल्याचे आढळून आले.

नाशिक : कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणी अनेक संघटनांनी शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान फाउण्डेशनचे अध्यक्ष संभाजी भिडे व समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे या दोघांविरुद्ध राज्यातील काही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्याचा फायदा उठवून अज्ञात व्यक्तीने एकबोटे व भिडे यांना ‘वॉन्टेड’ ठरवून त्यांचे छायाचित्रे असलेले पोस्टर्स नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लावल्याने खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या नावे लावण्यात आलेल्या या पोस्टर्स प्रकरणी पुणे पोलिसांनी कानावर हात ठेवले असले तरी, स्थानिक पोलिसांना मात्र या पोस्टर्सची खबरबातदेखील नसल्याचे आढळून आले.बुधवारी रात्री सदरचे पोस्टर्स नाशिक शहरातील जुने बस स्थानक, ठक्कर बजार बसस्थानक, अशोकस्तंभ, शालिमार चौक, नाशिकरोड रेल्वेस्थानकाबरोबरच शहरातील महत्त्वाचे व गर्दीच्या ठिकाणी तसेच एसटी बसवर चिकटवल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे. मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे असे नावे असलेल्या या पोस्टर्सवर दोघांचीही ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट छायाचित्रे छापण्यात आली आहे आणि हे दिसल्यास संपर्क साधावा म्हणून ०२०२६१२५३९६/०२०२६२०८२०१ (पुणे पोलीस) असे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत. दि. १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला वंदन करून निघालेल्या कार्यकर्त्यांवर दगडफेक झाल्याने संपूर्ण राज्यात दंगल उसळली होती. यात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक, लाठीमाराच्या घटना घडून दोघा-तिघांना जीवही गमवावा लागला. भाजपेतर पक्षांनी या दंगलीमागे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजीराव भिडे व समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा व त्यांनीच दंगल पेटविल्याचा आरोप केला आहे. या दंगलीतून राज्यातील राजकारण ढवळून निघालेले असताना भिडे, एकबोटे यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर येऊन आपली बाजूही मांडली आहे. त्यांच्याविरुद्ध पुण्यासह काही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या दंगलीची न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असून, तूर्त हा वाद रस्त्यावरच्या लढाईतून शमला असला तरी, नेमका त्याचाच लाभ उठवून पुन्हा एकदा सामाजिक तणाव निर्माण करण्यासाठी भिडे, एकबोटे ‘वॉन्टेड’ असल्याच्या पोस्टर्सबाजी करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी अनेक ठिकाणी सदरचे पोस्टर्स पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. भिडे, एकबोटे खुले आम फिरत असताना पोलिसांच्या दप्तरी ते फरार दाखविण्याच्या या प्रकाराबद्दल काहींनी संशयही व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिक