शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भवानी माता डोंगर विकासासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:39 IST

तालुक्यातील हरसूल येथील भवानी माता डोंगरावर केंद्र सरकारच्या पर्यटन विकास योजनेतून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे साकडे दिल्ली येथील पर्यटन मंत्रालयाच्या अपर सचिव मीनाक्षी शर्मा यांच्याकडे खासदार हेमंत गोडसे, त्र्यंबकेश्वर विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख मिथुन राऊत, शिवसेना त्र्यंबकेश्वरचे माजी तालुकाप्रमुख समाधान बोडके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे घातले.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल येथील भवानी माता डोंगरावर केंद्र सरकारच्या पर्यटन विकास योजनेतून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे साकडे दिल्ली येथील पर्यटन मंत्रालयाच्या अपर सचिव मीनाक्षी शर्मा यांच्याकडे खासदार हेमंत गोडसे, त्र्यंबकेश्वर विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख मिथुन राऊत, शिवसेना त्र्यंबकेश्वरचे माजी तालुकाप्रमुख समाधान बोडके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे घातले.  हरसूलजवळील नैसर्गिक वनौषधी जपणारा डोंगर म्हणून हरसूल येथील भवानी मातेच्या डोंगराकडे पाहिले जाते. एकेकाळी उजाड, ओसाड, निर्जल असा असणारा हा भवानीमातेचा डोंगर वनविभागाच्या मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीने आजमितीस हा डोंगर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या ठेव्याने गजबजून निघाला आहे. ५२ हेक्टर क्षेत्र असलेला हा संपूर्ण डोंगर वनविभागाच्या मालकीचा आहे. येथे नवरात्रोत्सव काळात दर्या मित्रमंडळाच्या तसेच हरसूल परिसरातील नागरिकांच्या वतीने नवरात्रोत्सव काळात विविध उपक्र मांचे आयोजन केले जाते.  यावेळी भवानी मातेच्या चरणी त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, नाशिकसारख्या ठिकाणांहून हजारो भाविक-भक्तांची मोठ्या प्रमाणात मातेच्या दर्शनासाठी गर्दी असते, परंतु मूलभूत सोयी-सुविधांअभावी येणाºया भाविक-भक्तांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. डोंगरावर जाण्यासाठी पायºया नसल्याने चिखल तुडवित जावे लागते. पिण्याचे पाणी, विजेची गैरसोय, भक्त निवास शेड यांसारख्या अनेक समस्यांची वानवा आहे.  त्र्यंबकेश्वर तालुका हा निसर्गाने सुख समृद्धीने संपन्न असून, मोठ्या प्रमाणावर जंगल संपत्ती आहे. यात वनौषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या झाडांचे योग्यरीत्या संवर्धन व्हावे व पर्यटनाच्या दृष्टीने विशेष दर्जा देऊन वनजंगल परिसराचा विकास करावा याकरिता वनविभागाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात केली आहे.याशिवाय भवानी डोंगरासह तालुक्यात महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतांची रांग त्र्यंबकेश्वर तालुक्यातून गेली आहे. त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी, गंगाद्वार, अंजनेरीसह हरसूल या संपूर्ण पट्ट्यातील दºया-खोºया पर्वतराजी वनौषधी संपन्न आहेत. येथील कडे, कपारी गिर्यारोहकांचे आकर्षक स्थळे आहेत आणि याच दृष्टीने अंजनेरी येथे गिर्यारोहकांसाठी निवारागृह देखील उभारले आहेत, तसे निवारागृह तालुक्यातील अन्य डोंगर परिसरात देखील उभारावेत, अशी मागणी तालुक्यातील लोकांची आहे.  यावेळी हरसूल सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण मेघे, सरपंच रावसाहेब कोठुळे, सुनील साबळे, धीरज पागी, अशोक उघडे, हेमराज पढेर आदी उपस्थित होते.हरसूलजवळील भवानी माता डोंगर हा नैसर्गिक वनऔषधी जपणारा डोंगर आहे. या मातेच्या डोंगरावर जाण्यासाठी कुठल्याही मूलभूत सोयी-सुविधा नाहीत, तसेच नवरात्रोत्सव काळात येथे हजारो भाविक मातेच्या चरणी लीन होतात. यावेळी अनेक अडचणींचा सामना भाविक भक्तांना करावा लागतो. त्यामुळे या भवानी माता डोंगराला पर्यटनस्थळ घोषित करून मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.  - समाधान बोडके, माजी तालुकाप्रमुख, शिवसेना

टॅग्स :Nashikनाशिक