शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राष्टवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:49 IST

राष्टवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्याचा निर्णय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आहे.

नाशिक : राष्टवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्याचा निर्णय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीअंतर्गत रविवारी राष्टÑवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. विद्यमान जिल्हाध्यक्षांसह राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्ये यांनीही जोरदार तयारी केल्यामुळे चुरस अधिक वाढली आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्टÑवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, कोंडाजीमामा आव्हाड आणि सचिन पिंगळे यांचीही नावे जिल्हाध्यक्षपदासाठी पुढे आली आहेत. जिल्हाध्यक्षपसाठी जोरदार फिल्ंिडग लावण्यात आल्यामुळे अनेक दावे, प्रतिदावे आणि तक्रारींचा सूरही इच्छुकांमध्ये उमटला. विद्यमान जिल्हाध्यक्षांविषयीदेखील मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्याचे समजते. तर एका गटाने ओबीसी चेहऱ्याला संधी देण्याबाबतचा युक्तिवाद केला. हा सारा घटनाक्रम आणि इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी यामुळे दोनदा  विचारविनीमय करूनही कोणत्याही एका नावावर एकमत होऊ शकले नाही. अखेर निवडणूक निरीक्षक अविनाश अधिक यांनी इच्छुकांच्या नावांवर प्रदेशमध्येच चर्चा होऊन प्रदेशपातळीवरून जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे जाहीर करून श्रेष्ठींकडून येणाºया नावाला सर्वांनी समर्थन द्यावे असा ठरावच केला.विद्यमान जिल्हाध्यक्षांविषयी तक्रारीविद्यमान जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी जिल्ह्यात विविध प्रश्नांवर वेळोवेळी रस्त्यावर उतरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतरही त्यांच्याविषयी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक निरीक्षकांकडे तक्रारी केल्याचे बोलले जात आहे.  त्यातच अनेक दिग्गज जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असून, काहींनी वरूनच मोर्चेबांधणी केल्यामुळे विद्यमान जिल्हाध्यक्ष पगार यांच्यापुढे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.  किंबहूना यंदा नवीन चेहºयाला संधी देण्याबाबतच सर्वसंमती झाल्याचेही समजते. त्यामुळे पगार यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस