शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भरवीरचे जवान अर्जुन वाळुंज यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:36 IST

चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) यांचे अरुणाचल प्रदेशातील टेंगा येथे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह भरवीर येथे आणण्यात येणार असून, तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अर्जुन यांच्या निधनाचे वृत्त समजताच भरवीर गावावर शोककळा पसरली.

नाशिक : चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) यांचे अरुणाचल प्रदेशातील टेंगा येथे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह भरवीर येथे आणण्यात येणार असून, तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अर्जुन यांच्या निधनाचे वृत्त समजताच भरवीर गावावर शोककळा पसरली.त्यांच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, विवाहित बहीण, पत्नी असा परिवार आहे. अर्जुन यांचे प्राथमिक शिक्षण भरवीर येथे, तर बारावीपर्यंतचे शिक्षण चांदवड येथे झाले आहे. २०१० मध्ये ते लष्करामध्ये दाखल झाले. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह आसरखेडे येथील उत्तम पाटील गांडुळे यांची कन्या पूनम हिच्याशी झाला. त्यांची नियुक्ती सिलिगुडी विभागातील टेंगा येथे होती. तेथेच त्यांचे निधन झाल्याचे लष्कराच्या सूत्रांनी कळविले आहे.अर्जुन यांच्या निधनाचे वृत्त कळल्यावर आप्तेष्ट, नातलग घरी येताच अर्जुनच्या आई, वडील व भावाने एकच हंबरडा फोडला. अर्जुन हा अल्पभूधारक शेतकरी प्रभाकर पुंजाजी वाळुंज यांचा मुलगा असून, शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. मुलगा नोकरीस लागल्याने कुटुंबाला मोठा आधार मिळाला होता. अर्जुनच्या अचानक निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू