नाशिक : अधिकमासानिमित्त देवदर्शन व धार्मिक विधीसाठी शहरात आलेल्या परप्रांतिय भाविक महिलेचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़२) दुपारी रामकुंड परिसरात घडली़आंध्र प्रदेश येथील तिरुमला शेट्टी रामक्रिश्न (६४, नेताजीनगर, कटप्पा) हे श्रीमती व्यंकट लक्षम्मा मंगला यांच्या समवेत शनिवारी देवदर्शन व धार्मिक विधीसाठी पंचवटीतील रामकुंडावर आले होते़ या ठिकाणी धार्मिक विधी करीत असलेल्या व्यंकट एल. मंगला यांच्याकडील चार तोळे वजनाची सोन्याची चैन व रोख रक्कम असा एक लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला़ या प्रकरणी तिरुमला शेट्टी यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़
भाविकाच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:59 IST