सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहरविकास आघाडीच्या नगरसेविका भारती सूर्यवंशी यांची गुरु वारी (दि.८) बिनविरोध करण्यात आली. दरम्यान नगराध्यक्ष सुनील मोरे चार दिवस रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आला.शहर विकास आघाडीच्या नगरसेविका सुनिता मोरकर यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष सभा बोलावली होती.या सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीच्या नगरसेविका भारती सूर्यवंशी यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या पदासाठी निर्धारित वेळेत सूर्यवंशी यांचा एकमेव अर्ज आल्याने तहसीलदार इंगळे पाटील यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. त्यांना भाजपचे नगरसेवक महेश देवरे, निर्मला भदाणे हे सूचक व अनुमोदक होते. याप्रसंगी नविनर्वाचित उपनगराध्यक्षा सूर्यवंशी यांचा नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सत्कार केला.निवडीप्रसंगी मावळत्या उपनगराध्यक्षा सुनिता मोरकर, नगरसेवक दीपक पाकळे,दिनकर सोनवणे, राकेश खैरनार, मुन्ना शेख, बाळासाहेब बागुल, नगरसेविका रु पाली सोनवणे, संगीता देवरे, पुष्पा सूर्यवंशी, सोनाली बैताडे, सुवर्णा नंदाळे, सुरेखा बच्छाव, आशा भामरे, शमीन मुल्ला, मुख्य अधिकारी हेमलता डगळे आदी उपस्थित होते.
सटाणा पालिकेच्या उपाध्यक्षपदी भारती सूर्यवंशी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 16:26 IST
सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहरविकास आघाडीच्या नगरसेविका भारती सूर्यवंशी यांची गुरु वारी (दि.८) बिनविरोध करण्यात आली. दरम्यान नगराध्यक्ष सुनील मोरे चार दिवस रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आला.
सटाणा पालिकेच्या उपाध्यक्षपदी भारती सूर्यवंशी बिनविरोध
ठळक मुद्देसुनिता मोरकर यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदाच्या निवडीसाठी निवडणूक