दरम्यान, गुरुवारी सकाळी आरोग्य राज्यमंत्री म्हणून डॉ. भारती पवार यांनी सूत्रे स्वीकारली. यावेळी त्यांनी मंत्रालयातील प्रत्येक अधिकाऱ्यांकडून कामकाजाची पद्धत समजावून घेण्याबरोबरच ओळख परेडही झाली. दुपारनंतर मात्र त्यांनी सायंकाळी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची तयारी व त्या विषयीचा राजशिष्टाचार अधिकाऱ्यांकडून समजावून घेतला. याच दरम्यान, सकाळीच त्यांनी नाशिकला दूरध्वनी करून कुटुंबीयांची विचारपूस केली. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाबाबत ऐनवेळी पक्षनेतृत्वाकडून निरोप आल्याने डॉ. भारती पवार या पती प्रवीण पवार यांच्या सोबत दिल्लीला रवाना झाल्या होत्या. आता मात्र त्या दिल्लीत एकट्या असल्याने गुरुवारी सकाळीच त्यांचे कुटुंबीय दिल्लीला रवाना झाले आहे.
(फोटो ०८ पवार)- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताना डॉ. भारती पवार.
२) आरोग्य मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शुभेच्छा स्वीकारतांना डाॅ. भारती पवार.