शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भारिप बहुजन महासंघाचे ‘दे धक्का’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:32 IST

नाशिक : देशपातळीवर इंधनाची दररोज होणाऱ्या दरवाढीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकीची अंत्ययात्रा काढून ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सकाळी शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी एका चारचाकी हातगाडीवर दुचाकी ठेवून तिची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी केंद्र सरकारच्या ...

नाशिक : देशपातळीवर इंधनाची दररोज होणाऱ्या दरवाढीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकीची अंत्ययात्रा काढून ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सकाळी शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी एका चारचाकी हातगाडीवर दुचाकी ठेवून तिची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘बहोत हुई मन की बात, अब की बार घर बैठो बीजेपी सरकार’ अशा घोषणा देण्यात आल्या. मध्यवर्ती बसस्थानक चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला व शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, दररोजच्या इंधन दरवाढीमुळे महागाईत वाढ हाते असून, सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया बीजेपी सरकारने नोटबंदी, शेतकºयांची फसवी कर्जमाफी, शेतमालाचा पडलेला भाव अशा सर्वच पातळीवर नागरिकांचा विश्वासघात केला आहे. सरकारने लवकरात लवकर महागाई आटोक्यात आणावी, इंधनाचे दर कमी करावे आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.  आंदोलनात भारिपचे जिल्हाध्यक्ष वामन गायकवाड, अरविंद जगताप, विनय कटारे, ताराचंद मोतमल, बाबा केदारे, स्वराज नंद, अजय काळे, मारुती घोडेराव, गौतम बागुल, डॉ. अनिल सोनवणे, समाधान चव्हाणे, गणेश शिरसाठ आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Petrolपेट्रोल