शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत बंद’चा नाशिकच्या बाजारपेठेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:26 IST

देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभरातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या ‘भारत बंद’चा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठ्या प्रमाणात बसला.

नाशिक : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभरातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या ‘भारत बंद’चा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठ्या प्रमाणात बसला. नाशिक शहरासह उपनगरांमध्येही दुपारपर्यंत कडकडीट बंद पाळण्यात आल्याने जवळपास ५० टक्के उलाढाल ढप्प झाली.  नाशिकमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, सराफ बाजार, रविवार कारंजा, शालिमार परिसरात बाजारपेठेला काँग्रेसच्या बंदचा फटका बसला. त्याचप्रमाणे उपनगरांमध्येही अनेक दुकाने बंद राहिल्याने शहरातील जवळपास अडीचशे ते तीनशे कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना नागरिकांनी मखर सजावटीसह पूजेच्या साहित्याची खरेदी सुरू केलेली आहे. परंतु, सकाळपासूनच दळवणळाची साधने उपलब्ध नसल्याने बाजारपेठेत ग्राहकांचा ओघही ओसरल्याचे दिसून आले. त्यामुळे काही दुकानदारांनी सकाळपासून दुकाने उघडी ठेवूनही त्यांना ग्राहकच नसल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. परंतु दुपारनंतर व्यवहार सुरू झाल्याने नाशिककरांनी सायंकाळी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढल्याने बाजारपेठेत व्यवहार सुरळीत झाले. मात्र अनेक ग्राहकांनी बंदमध्ये बाहेर पडण्याऐवजी आजची खरेदी उद्यावर ढकलल्याने अनेक व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.सराफ बाजाराला ३० टक्के फटकाभारत बंदचा सराफ बाजाराला जवळपास २५ ते ३० टक्के फटका बसल्याचे दिसून आले. सराफ बाजारातील अनेक व्यावसायिकांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली. त्यानंतरही ग्राहकांचा ओघ नेहमीसारखा नसल्याने सराफ बाजारातही नेहमीच्या तुलनेत शांतता दिसून आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण गणपतीसाठी सोने-चांदीचे मोदक, दुर्वाहार यांससह पूजेचे साहित्य खरेदी करीत असतात. परंतु, भारत बंदमुळे ग्राहकच नसल्याने नेहमीच्या तुलनेत ३० टक्के उलाढाल ठप्प झाल्याचे दिसून आले.किरकोळ  बाजारही प्रभावित‘भारत बंद’चा सर्वाधिक प्रभाव किरकोळ बाजारावर दिसून आला. बंददरम्यान मालवाहतूक आणि व्यावसायिक गोदामे खुली होती. त्यामुळे घाऊक व्यापारावर बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. परंतु, किरकोळ विक्रेत्यांना बंदमुळे दुपारपर्यंत दुकाने बंद करावी लागली, दुपारनंतर दुकाने उघडूनही नेहमीच्या  तुलनेत ग्राहकांचा ओघ  नसल्याने किरकोळ बाजारावर बंदमुळे सर्वाधिक झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदMNSमनसे