शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भंडारदरा रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 00:56 IST

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने याचा सर्वांनाच त्रास होत असल्याने रस्ते दुरुस्त न केल्यास या परिसरातील चाकरमान्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे प्रवासी, वाहनधारक संतप्त : तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने याचा सर्वांनाच त्रास होत असल्याने रस्ते दुरुस्त न केल्यास या परिसरातील चाकरमान्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.घोटी-भंडारदरा रस्त्याचे घोटी ते पिंपळगाव मोरपर्यंतच कॉँक्रिटीकरण झाले. पिंपळगाव मोरपासून तालुक्यातील टाकेद, खेड, अधरवड, सोनोशी, वासाळी, इंदोरे, खडकेद, आंबेवाडी तसेच नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे कळसूबाई शिखर, रंदा, भंडारदरा, विश्रामगड, तांबकडा धबधबा, किल्ले बितनगड, अकोले आदी पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या या पिंपळगाव मोर ते वासाळी फाट्यापर्यंत रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मागील वर्षी बुजवलेले खड्डे या वर्षी पुन्हा पावसाने मोठ्या प्रमाणात उघडे पडले आहेत. तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या घोटीला जोडणारा व टाकेद - खेड गटातील हा महत्त्वाचा मार्ग असल्याने परिसरातील वाहनचालक, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी, वयोवृद्ध ग्रामस्थ आदी नागरिकांना या रस्त्याने नेहमी ये-जा करावी लागते तसेच या गावांमधील रुग्णवाहिकांनादेखील याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र या रस्त्याच्या दुरवस्थेने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेने परिसरातील नागरिक संतप्त आहेत. याची संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन दखल घेऊन पिंपळगाव मोरपासून पुढे वासाळी फाट्यापर्यंत कमीत कमी १५ किमीची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अन्यथा परिसरातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, अशी मागणी येथील नागरिकांकडून, प्रवासी वाहनधारकांकडून प्रकर्षाने होत आहे.सध्याच्या परिस्थितीत पावसामुळे धामणगाव ते टाकेद हा रस्ता अतिशय दयनीय झाला आहे. त्यातच या रस्त्यामधून समृद्धी महामार्गाचे काम चालू असल्याने बराच रस्ता खोदला गेला आहे. टाकेद ते अडसरे या ठिकाणी रस्त्याला चार ते पाच फुटांचे खोल खड्डे पडलेले आहेत. किमान टाकेद ते अधरवड टाकेद फाटा, वासाळी ते पिंपळगाव मोर रस्ता, धामणगाव ते अडसरे टाकेद रस्ता, टाकेद ते म्हैसवळण रस्ता या सर्व रस्त्यांवरील प्रशासनाने किमान खड्डे तरी भरणे गरजेचे आहेत ही अपेक्षा या परिसरातील ग्रामस्थांची आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक