शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भामेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:37 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील भामेर शिवारात शनिवारी (दि. २१) संध्याकाळी एका चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून जंगलात नेल्याची घटना घडली. रात्रभर गावकरी सर्वत्र मुलाचा शोध घेत होते. सकाळच्या सुमारास परिसरातील एका जंगलात मुलाचे शिर आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे.ताहराबाद वनक्षेत्रातील तळवाडे-भामेर परिसर हा जंगलांनी वेढलेला असून, या भागात ...

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील भामेर शिवारात शनिवारी (दि. २१) संध्याकाळी एका चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून जंगलात नेल्याची घटना घडली. रात्रभर गावकरी सर्वत्र मुलाचा शोध घेत होते. सकाळच्या सुमारास परिसरातील एका जंगलात मुलाचे शिर आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे.ताहराबाद वनक्षेत्रातील तळवाडे-भामेर परिसर हा जंगलांनी वेढलेला असून, या भागात मेंढपाळ नेहमी मुक्कामी असतात. एका मेंढपाळाच्या पडाव असलेल्या राहुटीमधून वडिलांजवळ झोपलेल्या कोमल नामदेव नामदास या अडीच वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून फरफटत जंगलात नेले. यानंतर गावातील नागरिकांनी रात्रभर सर्वत्र शोध घेतला; मात्र मुलगा आढळून आला नाही. दरम्यान, सकाळी काही लोक जंगलात शोधण्यासाठी गेले असता त्यांना मुलाचे शिर मिळून आले.  घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. या भागात तत्काळ पिंजरे लावण्यात येणार असून, मेंढपाळ कुटुंबीयांना शासकीय नियमानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे.  तसेच दुसºया घटनेत संध्याकाळी सिन्नरजवळील मोहदरी घाटात नाशिक-पुणे महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाºया बिबट्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. सुमारे साडेतीन वर्षांचा नर जातीचा बिबट्या या अपघातात मृत पावला. यावेळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वनविभागाचे अधिकाºयांनी तातडीने घटनास्थळ गाठले. वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, वनपाल अनिल साळवे, प्रितेश सरोदे, पोपट बिन्नर आदींनी स्पॉट पंचनामा केला. आज सकाळी पशुवैद्यकीय अधिकाºयांनी शवविच्छेदन करून वनविभागाच्या कर्मचाºयांनी मोहदरी वनोद्यानात मृत बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.निफाडला बिबट्या जेरबंदनिफाड तालुक्यातील शिवरे गावात धुमाकूळ घालणाºया बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. शिवरे गावातील बाजीराव सानप यांच्या शेतात लावलेल्या पिंजºयात पाच वर्षांचा नर जातीचा बिबट्या अडकला. सदर माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल प्रसाद पाटील, वनरक्षक व्ही. आर. टेकनर, दत्तू अहेर आदींनी पिंजरा ताब्यात घेतला. सुरक्षितरीत्या पिंजरा निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आला.