नाशिक : राष्ट्रसंत डॉ. भैयूजी महाराज यांच्या अस्थिकलशाचे रविवारी (दि. ८)शेकडो भाविकांनी रामकुंडावर दर्शन घेतल्यानंतर या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यातआले.भैयूजी महाराज यांची अस्थीयात्रा रविवारी नाशिकमध्ये पोहचली. यावेळी अस्थींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. रामकुंडावर सूर्योदय परिवाराच्या अनुयायांसह भैयूजी महाराज यांच्या चाहत्यांनीअस्थिकलशाचे दर्शन घेतले. दरम्यान, रामकृष्ण लहवितकर महाराज यांच्या प्रवचनाचालाभही अनुयायांनी घेतला. अस्थिकलशाचे दर्शन व प्रवचनानंतर अस्थीविसर्जन विधी करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, शिवाजी सहाणे, निवृत्ती अरिंगळे आदी उपस्थित होते.
भैयूजी महाराज यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:28 IST