नाशिक : इंदिरानगर येथील रहिवासी व बीवायके महाविद्यालयाची विद्यार्थिनी भैरवी भुरड नुकत्याच झालेल्या ‘मिस ग्लोबल एशिया’ स्पर्धेत कॉन्टीनेंटलची मानकरी ठरली आहे.१० सप्टेंबर रोजी ही स्पर्धा जमैकाच्या मोंटीगोको शहरात पार पडली. या स्पर्धेत विजेतेपद पटकावणाºया सौंदर्यवतीला इंटरनॅशनल स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होते. निरनिराळ्या ग्रुमिंग सेशननंतर उत्कंठादर्शकतेने ही स्पर्धा पार पडली. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या भैरवीने याआधी मिस ग्लोबल इंटरनॅशनल इंडिया या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. १० सप्टेंबर रोजी जमैकाच्या मोंटीगोको शहरात झालेल्या मिस ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत भैरवीने धडक मारत पहिल्या दहा क्रमांकामध्ये नंबर पटकवण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेत ती कॉन्टीनेंटल टायटल्सची विजेती ठरली आहे. याशिवाय याच स्पर्धेत तिने बेस्ट रॅम्प, बेस्ट कंजुनिअॅलिटी हा किताबही पटकावला आहे. भैरवीला नृत्याची आवड असून, तिने आत्तापर्यंत नृत्याच्या विविध स्थानिक स्पर्धांमध्ये बक्षिसे पटकावली आहेत. २०१६ मध्ये झालेल्या मिस टीजीपीसी या आॅनलाइन सौंदर्य स्पर्धेत तिने विजेतेपद पटकावले होते. याशिवाय मध्य अमेरिकेत झालेल्या सौंदर्य स्पर्धेत तिने पहिल्या दहामध्ये क्रमांक पटकावला होता. पुणे येथील टीआरओ स्टुडिओच्या रितिका रामप्री यांनी भैरवीला मार्गदर्शन केले.
भैरवी बुरड ‘मिस ग्लोबल एशिया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:41 IST