शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे भगूर-नानेगाव रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:46 IST

लष्कराच्या विजयनगर येथील संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहतूक सुरू असलेला भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

देवळाली कॅम्प : लष्कराच्या विजयनगर येथील संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहतूक सुरू असलेला भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.लष्कराच्या संरक्षिक भिंतीमुळे रस्ता बंद होण्यामुळे विद्यार्थी, कामगार वर्गासह शेतमाल वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार असून, नानेगाव ग्रामस्थांना शेतमाल देवळाली कॅम्प-भगूरला आणण्यासाठी शिंदे-पळसे नाहीतर दोनवाडे-राहुरी मार्गे लांबचा प्रवास करून जावे लागणार आहे. महाराष्टÑ शासनाकडून गावागावांना जोडणारे शिवरस्ते जोडण्याची उपाययोजना असताना स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वीपासून रस्ताच बंद करण्याच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या लष्कराच्या भूमिकेविरुद्ध लष्करी अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर या रस्त्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. स्थानिक पातळीवर कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या माध्यमातून लष्कर व ग्रामस्थ यांच्या प्रश्नांवर तोडगा काढत लष्करी हद्द व रेल्वे यादरम्यान पंधरा-वीस फुटांचा रस्ता कॅन्टोन्मेंट बोर्डाने करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांनंतर रस्त्याचे आश्वासन सर्वच अधिकारी विसरल्याने त्या रस्त्याच्या जागेवर संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे.भगूर-नानेगांव रस्ता बंदबाबत नानेगाव ग्रामस्थांनी रविवारी ग्रामस्थांची बैठक घेऊन रस्त्याच्या मुद्द्याबाबत लष्करी अधिकाºयांची भेट घेण्याचे नियोजित केले आहे.पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे बाधीत होणाºया नानेगावाला आता भगूरहून होणाºया वाहतुकीचा रस्ताच लष्करी प्रशासनामुळे बंद होणार आणि ‘इंग्रज बरे की अच्छे दिन चांगले’ अशी मनस्तापाची वेळ नानेगाव ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.वाहतूक इतरत्र मार्गस्थ करावी लागणारभगूरहून शिंदे-पळसेला जाणारा नानेगाव मार्गे रस्ता या लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे बंद होणार असून, भविष्यकाळात भगूर-इगतपुरीकडून शिंदे, पळसे, एकलहरा आदी गावांकडे जाणारा रस्ताच बंद होणार असल्यामुळे वाहतुकीची मोठी गर्दी नाशिकरोड मार्गे मार्गस्थ करावी लागणार आहे. ग्रामीण भागात भगूरहून नानेगाव, शिंदे, पळसे या गावांना जोडणारा मार्ग बंद झाला तर सध्या बंद असलेल्या नाशिक साखर कारखान्यालाही ऊस वाहतुकीसाठी मोठा फटका बसणार आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक