शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव पंचक्रोशीतचे आराद्य दैवत भगरीबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 17:59 IST

लासलगांव : लासलगांव व पंचक्र ोशीतील नागरीकांचे आराध्य दैवत भगरीबाबा यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह काळात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नामवंत किर्तनकारांची किर्तने व सायंकाळी हरीपाठाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे परीसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लासलगांव : लासलगांव व पंचक्र ोशीतील नागरीकांचे आराध्य दैवत भगरीबाबा यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह काळात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नामवंत किर्तनकारांची किर्तने व सायंकाळी हरीपाठाचे आयोजन करण्यात आले होते.पुण्यतिथीनिमित्त मंदीर परीसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्या हस्ते सपत्निक विधीवत पुजा व आरती करण्यात आली. त्यानंतर गावातुन बाबांची प्रतिमा व पालखीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.मिरवणुकीत लासलगावातील सर्व शाळांचे विद्यार्थी, पुरूष व महिला भजनी मंडळ, बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, न्यासाचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बाजार समितीचे रमेश पालवे, जिल्हा परीषद सदस्य डि. के. जगताप, नामको बँकेचे संचालक प्रकाश दायमा, कैलास सोनवणे, शिवाजी जगताप, बाजार समितीचे सहाय्यक सचिव सुदीन टर्ले यांचेसह कांदा व्यापारी पुरूषोत्तम चोथाणी, ओमप्रकाश राका, दत्तात्रय खुर्दे, प्रवीण कदम, बाळासाहेब दराडे, संतोष माठा, विलास जगताप, दत्तात्रय खाडे, मनिष सारस्वत, विलास सोनार, अनिल बांगर, वाल्मिक जाधव, सुरेश बोडके, संदीप गोमासे, नाना सुर्यवंशी, बाबा अमरनाथ ग्रुप व श्री गायत्री परीवाराचे सर्व सदस्य, माथाडी-मापारी कामगार, कांदा भरणार कामगार यांचेसह परीसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सदर मिरवणुक भगरीबाबा गावातील प्रमुख मार्गाने नेण्यात आल्या. नंतर समाधी मंदीराजवळ विसर्जीत करण्यात आली. मिरवणुक मार्गावर संपुर्ण गावात गायत्री परीवाराच्या महिलांनी आकर्षक रांगोळी काढुन मिरवणुकीची शोभा वाढवली. यावेळी रघुनाथ महाराज खटाणे, खेडलेझुंगे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.पुण्यतिथीनिमित्ताने भगरीबाबा मंदीरात नाशिक रक्तपेढी व रक्तसंक्र मण संशोधन संस्था, नाशिक यांच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबीरात ७२ लोकांनी आपले रक्तदान केले.त्यानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.पुण्यतिथी सोहळा यशस्वीतेसाठी पंकज होळकर, अशोक गायकवाड, सुनिल डचके, दत्तात्रय होळकर, राजेंद्र पाटील, सुरेश विखे, छगन शेलार, कैलास कुºहाडे, सुनिल उपाध्ये, गोरख विसे, ज्ञानेश्वर जगताप, रामदास गायकवाड, गणेश आहेर, सचिन वाघ, लाला ठाकरे, माथाडी-मापारी कामगार, कांदा भरणार कामगार यांनी परीश्रम घेतले.

टॅग्स :nifadनिफाडTempleमंदिर