शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयासाठी भाभानगरचीच जागा सुयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:42 IST

शहर विकास नियंत्रण नियमावलीच्या अधिन राहून आणि दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाचा विचार करूनच भाभानगर येथील जागेत शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. सदर जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि रुग्णालयासाठी लागणारी जागाही पुरेशी आहे. त्यामुळे स्त्री रुग्णालयासाठी भाभानगरचीच जागा सुयोग्य असल्याची स्पष्टोक्ती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.

नाशिक : शहर विकास नियंत्रण नियमावलीच्या अधिन राहून आणि दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाचा विचार करूनच भाभानगर येथील जागेत शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. सदर जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि रुग्णालयासाठी लागणारी जागाही पुरेशी आहे. त्यामुळे स्त्री रुग्णालयासाठी भाभानगरचीच जागा सुयोग्य असल्याची स्पष्टोक्ती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. दरम्यान, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच गेल्या चार वर्षांपासून सदरचे रुग्णालय उभे राहण्यास विलंब झालेला आहे. त्यामुळे या रुग्णालयाबाबत कोणीही राजकारण करू नये, असा सल्लाही फरांदे यांनी दिला आहे.  स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून आजी-माजी आमदार आमनेसामने उभे ठाकले आहे. माजी आमदार वसंत गिते व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी रुग्णालयाला उघडपणे विरोध दर्शविला तर प्रभागातील नागरिकांनीही एकत्र येत जनहित याचिका दाखल करण्याचा पवित्रा घेतला. या साºया घटना-घडामोडींनंतर आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी (दि.४) पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. फरांदे यांनी सांगितले, भाभानगरची जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि हाकेच्या अंतरावर बसस्थानके आहेत. परिसरातील महिलांना सदर रुग्णालय दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे बनणार आहे. बिटको रुग्णालय व शासकीय रुग्णालयात होणाºया गर्दीमुळे सामान्य कुटुंबातील महिलांना उपचार मिळण्यात गैरसोयीचे होते. त्यामुळे सदर शंभर खाटांचे रुग्णालय महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. शंभर खाटांच्या रुग्णालयाची निविदाप्रक्रिया व कार्यादेश होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. ...तर महिलाशक्ती रस्त्यावर उतरेल ४सामान्य गोरगरीब महिलांसाठी होणाºया या रुग्णालयाला कुणी विरोध करत असेल तर महिलाशक्ती रस्त्यावर उतरेल, असा इशाराही फरांदे यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून आपण या प्रकरणात संयम बाळगून आहे. भाजपात शिस्तीला महत्त्व दिले जाते. अन्यथा मलाही आक्रमक होता आले असते. परंतु, कुणीही यात राजकारण आणू नये. जनतेसाठीच सदर प्रकल्प राबविला जात असल्याने त्यांच्या बाजूने उभे राहावे, असा सल्लाही फरांदे यांनी दिला.