शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शबरी घरकुलांसाठी लाभार्थी मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:24 IST

आदिवासी बेघरांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शबरी घरकुल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३११० घरकुलांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असली तरी, या घरकुलांच्या लाभार्थींसाठी असलेले निकष पाहता, २९०१ लाभार्थींना अपात्र ठरविण्यात आले

नाशिक : आदिवासी बेघरांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शबरी घरकुल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३११० घरकुलांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असली तरी, या घरकुलांच्या लाभार्थींसाठी असलेले निकष पाहता, २९०१ लाभार्थींना अपात्र ठरविण्यात आले असून, उर्वरित ४८८ लाभार्थींची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याने शबरी घरकुलांसाठी जिल्ह्यात लाभार्थी मिळेनासे झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत शबरी घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला. राज्य शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून खास आदिवासींसाठी शबरी घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थींना घरकुलासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. शबरी घरकुलाचा निधी आदिवासी विकास विभागाचा असून, जिल्हा ग्रामीण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून तो लाभार्थींना वितरित केला जातो. शबरी आवास अंतर्गत जिल्हास्तरीय समितीचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष असून, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी हे समितीचे सचिव आहेत. या योजनेंतर्गत शासनाच्या आदिवासी विकास विभागाने जिल्ह्याला ६,४९८ इतके उद्दिष्ट दिले होते. मात्र सदरची आकडेवारी सन २०११च्या सामाजिक आर्थिक सर्वेक्षणातील असल्याने लाभार्थींची पडताळणी करून पात्र लाभार्र्थींची निवड करण्याचे निर्देश डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार प्रथम ग्रामसेवकांमार्फत प्रत्येक लाभार्थींची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांमार्फत तालुकांतर्गत पडताळणी करण्यात येऊन पशुधन विकास अधिकारी व पर्यवेक्षक यांच्यामार्फत जिल्हांतर्गत पडताळणी करण्यात आली. या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, आदिवासी विकास विभागातील सहायक प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.पुनर्तपासणी करण्याचे निर्देशया पडताळणीत जिल्ह्यातील ६,४९८ लाभार्थींपैकी २९०१ लाभार्थी निकषात बसत नसल्याचे आढळून आल्याने त्यांना अपात्र करण्यात आले आहे.च्४८८ लाभार्थींची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले आहेत.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाHomeघर