शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बेलूची सुप्रिया तुपे ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ ची मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:53 IST

नांदूरवैद्य : विविध राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामिगरी करत सिन्नर तालुक्यातील बेलू येथील सुप्रिया तुपे हिने आपली ...

ठळक मुद्देनाशिकला पहिल्यांदा बहुमान : ४१ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा

नांदूरवैद्य : विविध राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामिगरी करत सिन्नर तालुक्यातील बेलू येथील सुप्रिया तुपे हिने आपली कुस्तीतील विजयी घोडदौड कायम ठेवत वर्धा येथे झालेल्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य महिला कुमार गट केसरी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा - २०१९ या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यावर मात करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची मानकरी ठरली. जिल्हयाच्या कुस्ती इतिहासात सुप्रियाच्या रु पाने प्रथमच हा बहुमान नाशिकला मिळाला आहे.दिनांक २८ ते ३० जानेवारी २०१९ दरम्यान वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला कुमार गट केसरी स्पर्धेत आजपर्यंतच्या नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात महाराष्ट्रात प्रथमच नाशिक जिल्ह्याला महिला कुमार गट केसरीचा बहुमान मिळवुन देणारी सिन्नर तालुक्यातील बेलू येथील व गुरु हनुमान आखाडा साकुर फाटा येथे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू ज्ञानेश्वर शिंदे यांच्याकडून कुस्तीचे डावपेच शिकत असलेली सुप्रिया तुपे हिने नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत ६१ किलो वजनी गटामध्ये कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती व पुणे या महिला कुस्तीपटुंचा पराभव करून नेत्रदिपक कामगिरी करत ‘कुमार महिला महाराष्ट्र केसरी’ हा किताब मिळविला आहे.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, उपाध्यक्ष नागनाथ देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. सुप्रिया तुपे हि सध्या गुरु हनुमान आखाडा साकुरफाटा ता. इगतपुरी या केंद्रात कुस्तीचे प्रशिक्षण घेत असुन तिला केंद्राचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, व्यवस्थापक चांद्रयान शिंदे, कुंडलिक सारूक्ते, भरविरचे सरपंच दत्तु जुंद्रे, प्रशिक्षक प्रविण सुर्यवंशी, आप्पा धोंगडे, राष्ट्रीय चैंपियन कुस्तीपटू बाळु बोडके, संदिप गायकर, विष्णू धोंगडे, निवृत्ती धोंगडे, पांडुरंग जुंद्रे, बाळू जुंद्रे तसेच तिचे वडील माजी सैनिक बहिरू तुपे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सुप्रियाच्या या यशस्वी व उल्लेखनीय कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे कार्यवाह कैलास गायकवाड, प्राचार्य श्रीमती चड्डा, ताजवे, शिक्षक पाळदे यांनी तिचे कौतुक केले.