शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नीतिमान वकिलांवर विश्वास ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:59 IST

सध्या भारत एका वेगळ्याच स्थितीतून वाटचाल करत आहे. या स्थितीचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रात व समाजातील विविध घटकांवर झालेला दिसून येतो. वकिली व्यवसायदेखील याला अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे ७० टक्के वकिलांनी जरी नीतिमत्ता, व्यावसायिक मूल्ये सोडली असली तरी ३० टक्के वकील निश्चितपणे या मूल्यांची जोपासना करत आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांच्यावरील विश्वास नक्कीच वृद्धिंगत करायला हवा, असे मत ज्येष्ठ वकील दौलतराव घुमरे यांनी मुलाखतीतून व्यक्त केले.

ठळक मुद्देदौलतराव घुमरे ‘संवाद’च्या प्रकट मुलाखतीत व्यक्त केले मत

नाशिक : सध्या भारत एका वेगळ्याच स्थितीतून वाटचाल करत आहे. या स्थितीचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रात व समाजातील विविध घटकांवर झालेला दिसून येतो. वकिली व्यवसायदेखील याला अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे ७० टक्के वकिलांनी जरी नीतिमत्ता, व्यावसायिक मूल्ये सोडली असली तरी ३० टक्के वकील निश्चितपणे या मूल्यांची जोपासना करत आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांच्यावरील विश्वास नक्कीच वृद्धिंगत करायला हवा, असे मत ज्येष्ठ वकील दौलतराव घुमरे यांनी मुलाखतीतून व्यक्त केले.संवाद संस्थेच्या वतीने घुमरे यांच्या मुलाखतीचे कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब गुंजाळ, अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. क. का. घुगे हे उपस्थित होते. यावेळी घुमरे यांनी अ‍ॅड. मिलिंद चिंधडे, डॉ. शंकर बोºहाडे यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देत बालपणाच्या आठवणी, शिक्षणाच्या वाटचालीपासून देशात झालेले राजकीय-सामाजिक बदल, विविध राष्टÑीय नेत्यांचे विचार अशा चौफेर पद्धतीने आपले विचार मांडले.यावेळी घुमरे म्हणाले, व्यापारीवृत्तीमुळे देशातील सर्वच क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात नीतिमत्तेची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत. व्यापारी दृष्टिकोनचा पगडा सर्वच क्षेत्रात वाढत असताना वकिली क्षेत्रही त्यापासून सुरक्षित राहू शकले नाही; मात्र या देशातील लोक वेडे नाहीत की ते दररोज न्यायालयाचा उंबरा ओलांडतात. त्यांना खात्री असते वकील आपल्याला न्याय मिळवून देईल. गरिबीमुळे बालपणात अन्यायाविरुद्ध चीड येत होती. गांधीजी देशाची उभारणी करत असताना त्यांच्याविषयी काढल्या जाणाऱ्या वाईट उद्गारामुळे चीड निर्माण होत होती. त्यावेळी तरुणांना सोबत घेत मोर्चा काढला असता उदोजी वसतिगृहातून बाहेरचा रस्ता दाखविला गेला.सावरकर कोणालाही समजले नाहीसावरकर यांची विचारधारा, देशप्रेम, राष्टÑभक्ती भाजप, राष्टÑीय स्वयंसेवक संघासह कोणालाही समजलेली नाही, अशी खंतही घुमरे यांनी यावेळी बोलून दाखविली. सावरकरांच्या सभेला दोन तास उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या विचारांनी माझ्यावर पडलेल्या प्रभावातून मी आजही बाहेर येऊ शकलेलो नाही.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक