शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 18:43 IST

एकलव्य आदिवासी निवासी शाळा व वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे आदिवासी विकास विभाग तसेच वसतिगृह प्रशासनाची धावपळ उडाली होती.

ठळक मुद्देपेठरोड : भाजी, पोळीचा दर्जा सुधारणार दुपारी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून यापुढे चांगले भोजन देण्याच्या अटी-शर्तीवर विद्यार्थ्यांनी सुरू केलेले ‘अन्नत्याग’ आंदोलन मंगळवारी दुपारी मागे घेण्यात आल्याची माहिती वसतिगृह प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.एकलव्य आदिवासी निवासी शाळा व वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे आदिवासी विकास विभाग तसेच वसतिगृह प्रशासनाची धावपळ उडाली होती. सोमवारी रात्री आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त लोकेश सलामे, विद्यार्थी तसेच वसतिगृह प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अटी भोजन पुरवणा-या संस्थेकडे मांडून वसतिगृहातच हाताने बनविलेल्या पोळ्या बनवून देणे तसेच रोज जेवणात दिल्या जाणा-या भाजीचा दर्जा सुधराविण्याच्या अटीवर मंगळवारी विद्यार्थ्यांशी पुन्हा चर्चा करण्यात आल्यानंतर दुपारी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.पेठरोड एकलव्य निवासी शाळा व वसतिगृहात चारशेहून अधिक विद्यार्थी राहतात. इयत्ता सहावी ते १२वीपर्यंतचे ३५० विद्यार्थी शिक्षण घेतात भोजन पुरविण्याचा ठेका टाटा कंपनी सेंट्रल किचन संस्थेकडे दिला आहे. संस्थेकडून पुरवठा केले जाणारे भोजन अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सोमवारी दिवसभर जेवण नाकारले होते. भोजन पुरवठा करणा-या संबंधित कंपनीला वारंवार लेखी तक्रार करून जेवणाचा दर्जा सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करून शाळेचे प्राचार्य देवरे, गृहपाल एन. एस. चौधरी यांच्याकडे तक्रार करून आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी सकाळी या विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. यापुढे वसतिगृह आवारातच हाताने पोळ्या बनवून देणार तसेच दैनंदिन जेवणात दिल्या जाणा-या भाजीत रस्सा भाजी दिली जाणार अशा अटींवर विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेत मंगळवारी दुपारी भोजन घेतल्याची माहिती वसतिगृहाचे गृहपाल चौधरी यांनी दिली.

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाNashikनाशिक