शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:31 IST

दिंडोरी : तालुक्यातील रखडलेल्या जोरण लघुपाटबंधारे प्रकल्पास निधी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आमरण उपोषण पाच एप्रिलपासून काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मागे घेतले असल्याची माहिती उपोषणकर्ते किरण कड यांनी दिली.

दिंडोरी : तालुक्यातील रखडलेल्या जोरण लघुपाटबंधारे प्रकल्पास निधी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आमरण उपोषण पाच एप्रिलपासून काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मागे घेतले असल्याची माहिती उपोषणकर्ते किरण कड यांनी दिलीतालुक्यातील रखडलेल्या जोरण येथील प्रकल्पास आवश्यक निधीला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असली तरी अद्याप रखडलेल्या प्रकल्पाचे काम सुरू होत नसल्याने या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरण ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसत दिंडोरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरु वात केली. या आंदोलनाला अनेकांनी पाठींबा दर्शविला होता. त्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, माजी आमदार धनराज महाले, सुरेश डोखळे,सुनील जाधव आदींनी भेट घेत यास पाठींबा दर्शवत प्रकल्पास निधी मिकवून देण्यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सोबत स्वत: चर्चा करून निधी मिळवून देण्याचे आश्वासन भाऊसाहेब चौधरी यांनी दिले. प्रहारचे तालुकाध्यक्ष सुखदेव खुर्दळ यांनीही आंदोलकांची भेट घेत पाठींबा दिला.सायंकाळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बंडू शिंदे, अरु ण वाळके, सुनील जाधव यांनी मध्यस्ती केली. पाटबंधारे विभागाचे अभियंता मानकर यांनी आंदोलकांशी चर्चा करत पाच एप्रिलपासून काम सुरू होईल असे आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत प्रशासनाने शब्द पाळावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी गणपत बाबा कड, बाळासाहेब गायकवाड संतोश वाघ, अरूण कड, सुनिल गायकवाड, दत्तु गायकवाड,, गोकूळ गायकवाड आदि आंदोलक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक