शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

By admin | Updated: January 28, 2017 01:06 IST

जिल्हा परिषद : सोमपूर ग्रामपंचायत अपहार प्रकरण; सरपंच, ग्रामसेवकांवर आरोप

नाशिक : सोमपूर (बागलाण) ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी होऊन त्यात दोषी ठरविण्यात आलेले सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व दोषींवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.२६) जिल्हा परिषदेसमोेर सोमपूर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांनी उपोषण केले.यासंदर्भात निवेदन यापूर्वीच विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद व बागलाण गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. निवेदनात नमूद करण्यात आले होते की, उपलब्ध कागदपत्रांच्या व चौकशी अहवालाच्या निष्कर्षावरून बॅँकेच्या खात्यावरून १७ लाख १५ हजार रुपयांचा नियमबाह्ण खर्च करून अपहार झाल्याचा निष्कर्ष नोंदविलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकऱ्यांनी त्वरित कार्यवाही करून अपहार करण्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. यासंदर्भात सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले होते. प्रत्यक्षात १२ जानेवारी २०१७ पर्यंत काहीही कार्यवाही केलेली नाही. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम ५७ अन्वये प्राप्त होणारा ग्रामनिधी व कलम ५८ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११नुसार ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या निधीचा खर्च कसा करावा, याबाबत तरतुदी आहेत. परंतु सोमपूर ग्रामपंचायतीच्या कामकाजाची चौकशी अहवालाचे अवलोकन केले असता संबंधित कलमांचे उल्लंघन ग्रामपंचायतीने केल्याचे आढळून आले आहे. तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम ४५ नुसार कर्तव्यात कसूरदेखील केल्याचे स्पष्टपणे चौकशी अहवालाचे अवलोकन केल्यावर निदर्शनास येते. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीच्या निधी गैरव्यवहारात दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांच्यासह सोमपूर ग्रामपंचायतीचे सदस्य उषा भामरे, संगीता नहिरे, क्रांती भामरे, निर्मला सोनवणे, निंबा पिंपळसे तसेच ग्रामस्थांनी निवेदनानुसार गुरुवारी (दि. २६) जानेवारीला जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. (प्रतिनिधी)