नाशिक : सातपूरच्या ध्रुवनगर येथील महापालिका शाळा क्र. ३२ च्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय परिसरात वृक्षदिंडीचे आयोजन केले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी’ अशा घोषणा देऊन परिसरात जनजागृती करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष यावेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक चव्हाण, सोनवणे, काळे, चौरे, महाले यांनी नियोजन केले.
पालिका शाळेच्या वतीने वृक्षदिंडी
By admin | Updated: July 15, 2014 00:49 IST