शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षनगरला ‘महास्वच्छता’ अभियानाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:30 IST

नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया तसेच स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. सदर आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात नाशिक शहराला पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी मनपाला स्वच्छतेच्या कामात हातभार लावण्यासाठी लोकसहभाग नोंदवून दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे रविवारी ‘महास्वच्छता’ अभियान लोकसहभागास गोरक्षनगर येथून सुरुवात करण्यात केली.

पंचवटी : नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया तसेच स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. सदर आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात नाशिक शहराला पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी मनपाला स्वच्छतेच्या कामात हातभार लावण्यासाठी लोकसहभाग नोंदवून दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे रविवारी ‘महास्वच्छता’ अभियान लोकसहभागास गोरक्षनगर येथून सुरुवात करण्यात केली.  केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत, देशातील स्वच्छ तसेच प्रदूषणमुक्त शहरांसाठी गतवर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये नाशिक शहराचा पहिल्या दहामध्ये क्रमांक आणण्यासाठी मनपातर्फे स्वच्छतेच्या बाबतीत विविध पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे गेल्या वर्षभरापासून अनेक स्वच्छता अभियान राबवून या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला होता. अपुºया लोकसहभागामुळे यंदा नाशिक शहर स्पर्धेत मागे पडले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत केवळ मनपावर विसंबून न राहता स्वच्छता अभियानात नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत अभियानामध्ये सामील व्हावे यासाठी अभियान सुरू केले आहे. यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास त्याचे फायदे व परिसरातील विविध विकासकामांची माहिती दिली. डॉक्टरांनी डेंग्यू, मलेरियापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय दखल घ्यावी याबाबत सूचना केल्या. यावेळी झालेल्या स्वच्छता अभियान मोहिमेला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, डॉ. रविकिरण निकम, डॉ. साकले डॉ. तोरणे, डॉ. देशपांडे, डॉ. जायभावे उपस्थित होते. संपूर्ण गोरक्षनगरवासीय महिला, पुरुष तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व गोरक्षनगर मित्रमंडळाचे सदस्य सहभागी झाले होते.स्वच्छतेतून आरोग्य हा विचार रुजवण्यासाठी सदर उपक्रम गोरक्षनगरवासीयांच्या सहभागाने महिन्यातून किमान एक दिवस सातत्य ठेवून राबविण्यात येणार आहे. हे स्वच्छता अभियान केवळ गोरक्षनगर पुरतेच मर्यादित न ठेवता मंडळाचे कार्यकर्ते परिसरातील विविध भागांत जाऊन स्वच्छता अभियान राबविणार तसेच स्थानिकांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणार आहे.- प्रवीण जाधव, अध्यक्ष, गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळ

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNashikनाशिक