नाशिक : गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हास्तरीय समितीची बैठक होत नसल्याच्या कारणावरून पडून असलेल्या वन हक्क दाव्यांवर अखेर समितीच्या सदस्यांकरवी स्वाक्षºया करण्यास सुरुवात झाली असून, शुक्रवारी उपवन संरक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सुमारे शंभर दाव्यांच्या मंजुरीवर स्वाक्षºया केल्या आहेत.या संदर्भात बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. भारतीय प्रशासन सेवा व भारतीय वन सेवा या समकक्ष अधिकाºयांच्या सुंदोपसुंदीमुळे वन हक्क दाव्यांच्या मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक होत नसल्याने आदिवासींना ताबा देण्यासाठी तयार असलेले पाच हजार दावे निव्वळ अधिकाºयांच्या स्वाक्षरीमुळे पडून असल्याचे उघडकीस आले होते. या संदर्भातील वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी दर शुक्रवारी जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या असून, त्यापार्श्वभूमीवर उपवन संरक्षक रामानुजम यांनी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सुमारे शंभरहून अधिक दाव्यांवर स्वाक्षºया केल्या. मात्र शुक्रवारच्या बैठकीकडे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी वा अपर जिल्हाधिकारी तसेच समितीचे सदस्य सचिव अतिरिक्त आदिवासी आयुक्त या दोघांनीही पाठ फिरविली. त्यामुळे बैठक होऊ शकली नसली तरी, दाव्यांवर स्वाक्षरीचे महत्त्वाचे काम झाले आहे.
वन हक्क दाव्यांवर स्वाक्षºयांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:19 IST