शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

निर्मल गोदावरी साक्षरता यात्रेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 13:16 IST

त्र्यंबकेश्वर : श्रीगंगा गोदावरी अवतरण दिनाच्या पाशर््वभूमीवर गोदावरी साक्षरता यात्रेचा शुभारंभ गोदावरीच्या जलाने जलकुंभ भरून प्रारंभ करण्यात आला.

त्र्यंबकेश्वर : श्रीगंगा गोदावरी अवतरण दिनाच्या पाशर््वभूमीवर गोदावरी साक्षरता यात्रेचा शुभारंभ गोदावरीच्या जलाने जलकुंभ भरून प्रारंभ करण्यात आला. ब्रह्मगिरी येथील गोदावरीच्या उगमस्थानावरुन हा जलकुंभ भरून आणण्यात आला. कुशावर्त तिर्थावर गोदावरीच्या जलाची महापुजा करु न ही यात्रा नगरपरिषदेत आणण्यात आली. तेथे या साक्षरता यात्रेचा उद्देश सांगुन मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. जलकुंभ समोर टेबलावर ठेवला होता. तब्बल सहा राज्यांमधून प्रवास केलेली गोदामाइ सहाही राज्यांना सुजलाम सुफलाम करून थेट राजमहेंद्रीला बंगालच्या उप सागरात विलीन झाली. गोदावरी अवतरण दिनाचे औचित्य साधुन गोदावरी साक्षरता यात्रेस प्रारंभ झाला. तत्पुर्वी सहा राज्यांमधुन आलेल्या प्रतिनिधीं समवेत कार्यक्रम होऊन जल कलश ब्रम्हाव्हॅली शैक्षणिक कॅम्पसमध्ये ठेवण्यात आला. यावेळीगौरव पानगव्हाणे पाटील, विविध शाखेचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर पाटील, प्राचार्य विनायक निखाडे , प्राचार्य चंद्रकांत शिरसाट आदींनी स्वागत केले. यावेळी गोदावरी साक्षरता यात्रेसमवेत डॉ. जाना राजेश पंडीत, नितीन हिंगमिरे, रोहीत जन्नावार, निशिकांत पगारे, योगेश बर्वे,आनंद कवळे तसेच तेलंगणा राज्यातील वॉटर रिसर्चचे चेअरमन प्रकाश राव आदी उपस्थित होते.------------------------------------सहा राज्यातून १५०० किमी प्रवासतेलंगणा वॉटर रिसर्चचे चेअरमन प्रकाश राव म्हणाले. निर्मल गोदावरी साक्षरता अभियान यात्रा गोदावरीचे उगमस्थान ब्रम्हगिरीपासुन ते थेट महाराष्ट्र तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, ओरिसा व बंगाल असे सहा राज्यांमधुन सुमारे १५०० किलोमीटर्सचा प्रवास करीत आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रीच्या समुद्रात गोदामातेच्या उगमस्थानाचे जल कलशाची विधीवत पुजा करु न विसिर्जत करण्यात येईल. दरम्यान ही यात्रा काढण्या मागचा उद्देश असा की पुर्वी प्रत्येक नदीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन पवित्र होता. पण हल्ली नदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विपरीत होत आहे. पुर्वी नदीचा उपयोग होत असे तर आता नदीत सांडपाणी विसर्जन करणे, दुषित पाणी करणे, घाण टाकुन पवित्र नदीची गटारगंगा करणे. असे प्रकार बंद होण्यासाठी जनजागृती करणे त्यासाठी प्रचार प्रसार करणे हे काम मोठे असले तरी केवळ १५ दिवसांची निर्मल गोदावरी साक्षरता अभियान यात्रा नसुन हे काम कायम स्वरु पी चालणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन आराखडा तयार करतील अशी माहिती नमामी फाउंडेशनचे राजेश पंडीत यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक