शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री दीडपर्यंत उघडे राहतील बिअर बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:37 IST

राज्य सरकारने दुकाने व आस्थापना अधिनियमात नुकतीच सुधारणा केली असून, त्यात प्रामुख्याने बिअर बार, परमिट रूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, वाइन शॉप व चित्रपटगृहे उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळेत बदल करीत संबंधित आस्थापनांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन नियमानुसार रात्री दीड वाजेपर्यंत परमिट रूम व  बिअर बार उघडे ठेवता येणार असून, रात्री १० वाजता बंद होणाºया  वाइन शॉपला दीड तास अधिक कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

नाशिक : राज्य सरकारने दुकाने व आस्थापना अधिनियमात नुकतीच सुधारणा केली असून, त्यात प्रामुख्याने बिअर बार, परमिट रूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, वाइन शॉप व चित्रपटगृहे उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळेत बदल करीत संबंधित आस्थापनांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन नियमानुसार रात्री दीड वाजेपर्यंत परमिट रूम व  बिअर बार उघडे ठेवता येणार असून, रात्री १० वाजता बंद होणाºया  वाइन शॉपला दीड तास अधिक कालावधी वाढवून देण्यात आला आहे.  राज्यपालांच्या आदेशाने शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने राजपत्र प्रसिद्ध करून याची माहिती खुली केली आहे. पूर्वी रात्री १२ वाजेपर्यंत बिअर बार व परमिट रूम उघडे ठेवण्यास कायद्याने अनुमती देण्यात आली होती, तर मद्यविक्रीची दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत उघडी ठेवता येत होती. त्यातही अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून स्थानिक पोलिसांकडून परमिट रूम, वाइन शॉप चालकांवर दंडुकेशाही करून वेळेपूर्वीच आस्थापने बंद करण्यास भाग पाडले जात होते. मुळात शासनाने परमिट रूम, बिअर बार, वाइन शॉप चालकांच्या परवाना शुल्कात दुप्पट वाढ केली असताना त्यात बंदचा कालावधी, पोलिसांच्या जाचामुळे परवडत नसल्याची भावना आस्थापना चालकांकडून व्यक्त केली जात होती. त्याचा विचार करून शासनाने नवीन नियम लागू केले आहेत.  नवीन आदेशानुसार महापालिका क्षेत्रात परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्कापार्लर, डिस्कोथेक आणि ज्या-ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केले जाते ते सकाळी साडेअकरा वाजता उघडण्यात येतील व रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील, तर नगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सकाळी ११ वाजता उघडतील व रात्री साडेबारा वाजेपर्यंत सुरू राहतील. वाइन शॉप व मद्यविक्री करणारी महापालिका क्षेत्रातील दुकाने सकाळी साडेअकरा वाजता उघडतील व रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू राहतील. नगरपालिका व अन्य क्षेत्रामध्ये मात्र सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहतील. थिएटर आणि सिनेमा प्रदर्शित करणाºया गृहांना मध्यरात्री एक वाजेपर्यंत अनुमती देण्यात आली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक